तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेड येथे दि. 23 ते 26 मार्च पर्यंत होळी सणा निमित्त विविध कार्यक्रम

 

गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही होळी सणा निमित्त आदरणिय पंजप्यारे साहिबान याच्या सरप्रस्तीमध्ये साजरे होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक मा.डॉ. विजय सतबिर सिंघ जी IAS (R) यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु असून त्याकरीता गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी, विभाग प्रमुख व इतर कर्मचारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या विभागास जसे म.न.पा, विद्युत विभाग, पोलिस विभाग, वाहतुक यंत्रणा, अग्निशामन दल, या सर्वांना योग्य ती व्यवस्था करुन सहकार्य करण्यसाठी पत्राद्वारे निवेदन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम खालील प्रमाणे साजरे होणार आहेत.
दि. 23 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 पर्यंत शिख धर्माचे प्रसिध्द वीर रस कवि, धार्मिक
प्रवचनकार यांच्या वतीने गुरु साहिबांचे ईतिहास चे कथा-प्रवचन किर्तन होईल. दि. 24 मार्च 2024 रोजी रात्री 9:00 ते 01:00 वाजे पर्यंत दरवार साहिब येथे सिख सेवकजत्था
दिल्ली यांच्या वतीने किर्तन दरवार चे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये शिख धर्माचे प्रसिध्द रागी भाई अनंतवीर सिंघ जी व भाई वरजिंदर सिंघ जी लुधिआणेवाले यांचे किर्तन होईल.
दि. 25 मार्च 2024 रोजी भाई जैमल सिंघ जी सहगल परिवार मुंबई यांच्या वतीने रैण सभाई
किर्तन दरवार मागिल 71 वर्षापासून तख्त सचखंड साहिब येथे आयोजित करण्यात येते त्याप्रमाणे या वर्षी ही या रैण सभाई किर्तन दरवारचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शिख धर्माचे प्रसिध्द रागी भाई जसविंदर सिंघ जी टेक्सला टी.व्ही., रागी भाई जगजीत सिंघ जी बबीहा दिल्ली, भाई सुखदीप सिंघ जी श्री दरबार साहिब अंम्रितसर यांचे किर्तन-प्रवचन होईल.
दि. 26 मार्च 2024 रोजी सायंकाळी 04:00 वाजता परंपरागत होला महल्ला तख्त सचखंड
साहिब येथून अरदास करुन गुरु साहिबचे निशानसाहिब, घोडे, किर्तनी जत्थे, गतका पार्टी, भजन मंडली यांच्या सह आदरणिय जत्थेदार साहिब यांच्या सरप्रस्तीमध्ये भजन किर्तन करत गुरुद्वारा गेट नं. 1 पासून गुरुद्वारा चौरस्ता महावीर चौक हल्लाबोल चौक पर्यंत पोहचून येथे परंपरागत धार्मिक रीति प्रमाणे 'बल्लाबोल' कार्यक्रम साजरा होईल व परंपरागत मार्गाने गुरुद्वारा बाऊली साहिब येथे पोहचून रात्री 11 वाजे पर्यंत गुरुद्वारा नगीनाघाट पासून गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब येथे पोहचून समापन होईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा.

टिप्पण्या