उमरी आणि अर्धापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार

 

माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून 17 गावातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 
नांदेड, दि.18 :- उमरी आणि अर्धापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून उमरी तालुक्यातील सावरगाव, महाटी, बोळसा, कौडगाव, वाघलवाडा यासह १४ आणि अर्धापूर तालुक्यातील ०३  अशा एकूण 17 गावांमधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश सोहळा आज सोमवारी ( दि.१८ ) आयटीएम येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्यासह आ.राजेश पवार, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी सभापती किशोर स्वामी, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके,माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, मारोती पाटील शंखतीर्थकर, बापूसाहेब बोरगावकर, शंकर पाटील सावरगावकर, ज्ञानेश्‍वर पाटील सावंत,प्रा. मनोहर पवार, व्यंकटराव मामा कल्याणकर, भगवान दंडवे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी उमरी तालुक्यातील सावरगाव येथील दिपक पाटील पंढरे यांच्यासह 10 जण,महाटी येथील बळवंत सोपानराव मोरे 10, बोळसा येथील बबनराव शिंदे यांच्यासह 10, कौडगाव येथील बापूसाहेब येताळे यांच्यासह 30 ,वाघलवाडा येथील शेख जाकीर यांच्यासह 5, बीजेगाव येथील  गणपतराव हंबर्डे यांच्यासह 10,हस्सा येथील देवराव पाटील हस्सेगावकर यांच्यासह 30, नागठाणा येथील साहेबराव लिंगाडे यांच्यास 10, चिंचाळा येथील विजयकुमार शिंदे यांच्यासह  5,मेंडका येथील दत्ता जाधव यांच्यासह 8, गोळेगाव येथील रमेश  सावंत यांच्यासह 14, मालेगाव ता.अर्धापूर येथील बालाजीराव मरकुंटे, आणि अर्धापूर तालुक्यातील सांगवी खु. येथील रामा कल्याणकर यांच्यासह 8, खडकी येथील पुंडलिक बोराटे यांच्यासह 36 आणि कोंढा येथील रामराव कदम यांच्यासह 16 जणांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री  खा.अशोकराव चव्हाण यांनी उपरणे पांघरुन वरील सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज