ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा २२ मार्च रोज शुक्रवारी जिल्हास्तरीय मेळावा

नांदेड : सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ मार्च रोज शुक्रवारी सकाळी ११-०० वाजता सीटू कार्यालय, एमजीएम कॉलेज समोर,नांदेड येथे येथे ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने अन्य संघटनांना बरोबर घेऊन मोठा लढा करण्यात आला. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक दरात ३४% वाढीचा व कमिशन दर २०%करणारा सामंजस्य करार करावा लागला आहे.

परंतु नांदेड जिल्ह्यातील कारखाने या कराराची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच वीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ऊसतोडणी व वाहतूक कामगार, मुकादम,वाहतूकदार यांचेसाठी संघटनेच्या रेट्यामुळे सरकारला कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे लागले. परंतु गेली दोन वर्षे त्यांची नोंदणी व प्रत्यक्ष लाभ सुरु करण्याचे काम रखडलेले आहे. या संदर्भात राज्य शासन प्रचंड उदासीन असून जिल्ह्यातील ऊसतोडणी वाहतूकदार,मुकादम यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अभ्यासक कॉ.प्रा.सुभाष जाधव (कोल्हापूर) हे नांदेड मध्ये होणाऱ्या मिळाव्यास उपस्थितीत रहाणार आहेत.

उपरोक्त मेळाव्यास ऊसतोडणी व वाहतूक कामगार तसेच मुकादम वांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

अशी माहिती सीटू कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आ

टिप्पण्या