कांग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक पदी शेख युसूफ भाई यांची नियुक्ती.

प्रतिनिधी                   

      शेख युसूफ यांची कांग्रेस पक्षच्या 
नांदेड शहर व ग्रामीण जिल्ह्याचा सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी राज्यात पक्ष निरीक्षकाच्या नियुक्त्या केल्या आहेत त्यात औरंगाबाद कांग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ भाई यांची नांदेड जिल्हा कांग्रेस च्या पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आमदार नाना भाऊ पटोले यांच्या आदेशानुसार उपाध्यक्ष तथा संघटन प्रशासन प्रमुख नाना गावंडे यांनी केली आहे
 शेख युसूफ भाई यांची नांदेड जिल्हा कांग्रेस पक्षाच्या पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे पक्ष श्रेष्ठींनी दिलेली पक्ष निरीक्षकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पक्ष निरीक्षक शेख युसुफ भाई हे आज गुरूवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, आजी ,माजी आमदार खासदार आजी ,माजी महापौर ,उपमहापौर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती जिल्ह्यातील नगरपालिका चे अध्यक्ष उपाध्यक्ष प स चे आजी माजी सभापती उपसभापती सदस्य , शहर व जिल्ह्यातील नगरसेवक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष पदाधिकारी आघाडी चे पदाधिकारी विविध सेल चे पदाधिकारी ब्लॅक अध्यक्ष कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पक्ष संघटन पक्ष वाढीसाठी प्रयत्न आदी विषयावर चर्चा करणार असून बैठकीतील चर्चेचा अहवाल प्रदेश कार्यालयात सादर करणार आहेत 
टिप्पण्या