प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारी विश्वकर्मा सन्मान योजना सुकाणू समिती नांदेड जिल्हा सदस्य पदी भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर यांची केंद्र शासनाने नियुक्ती केली आहे.
ओबीसी प्रवर्गातील लोहार , सोनार, सुतार, न्हावी, गवंडी, धोबी, चर्मकार, मूर्तिकार, शिल्पकार, माळी यासारख्या अठरा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या समाजातील कारागिरांना तीन लाख रुपये कर्ज 5% व्याज दराने देणे , साहित्य खरेदीसाठी 15000 रुपये अनुदान व 30 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी 15000 रुपये अनुदान देय असणारी अत्यंत व्यापक ही योजना आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठित करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड, सहसंचालक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय छत्रपती संभाजी नगर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नांदेड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी नांदेड, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड हे अधिकारी पदसिद्ध सदस्य असून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी समिती सचिव आहेत.
या अत्यंत महत्त्वाच्या समितीवर केंद्र सरकारने अशासकीय सदस्य म्हणून मुखेड येथील भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर, भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व हिमायतनगर येथील डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांची नियुक्ती केली आहे.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी निकष पात्र व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांची शिफारस करण्याचे अधिकार या समितीस देण्यात आले आहेत.
डॉ. माधव पाटील उच्चेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते असून अभ्यासू , प्रभावी वक्ता व पक्षनिष्ठ व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या निवडीबद्दल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. डॉ. तुषार राठोड , आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार , आ. भीमराव केराम , प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे , प्रदेश सचिव देविदास राठोड, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे , प्रदेश कार्यकारिणी सदस्य गंगाधरराव जोशी , सुधाकर भोयर , उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख , सुभाषराव साबणे, लक्ष्मणराव ठक्करवाड , माणिक लोहगावे , प्राचार्य बालाजी गिरगावकर यांनी अभिनंदन केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा