आता घरांच्या प्रश्नावर २७ रोजी विधान भवनावर गिरणी कामगार 'आक्रोश' मोर्चाने धडकणार!*

मुंबई १९: गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या‌ प्रश्नावर" विधान भवनावर"आयोजित करण्यात आलेला २८ रोजीचा "आक्रोश मोर्चा...


मुंबई १९: गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या‌ प्रश्नावर" विधान भवनावर"आयोजित करण्यात आलेला २८ रोजीचा "आक्रोश मोर्चा",अर्थसंकल्प जाहीर होत‌‌ असल्याने, मंगळवार दि.२७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर प्रचंड संख्येने धडकणार आहे.*

   दि.७फेब्रुवारी लालालबाग,भारतमाता सिनेमागृह येथे आयोजित करण्यात आलेले गिरणी कामगार आणि चाळरहिवाश्यांचे "धरणे आंदोलन" चांगलेच गाजले.एकही गिरणी कामगार हक्काच्या घरांपासून वंचित रहाता कामा नये! मुंबई शहर विकास नियमावली अंतर्गत गिरणी चाळींत रहाणा-या कामगार आणि उपभोगता रहिवाशांच्या धोकादायक चाळींची पुनर्बांधी तेथेच झाली पाहिजे! आदी मागण्या करण्यात आल्या.

     आता पर्यंत घरांसाठी १ लाख ७५ हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. कामगार संघटना कृती संघटनेने केलेल्या गेल्या दहा वर्षांच्या लढ्यात फक्त १६ हजार घरे गिरणी कामगारांना सोडतीत लागली.मग १लाखावरील कामगारांना घरे कधी मिळणार? उपलब्ध जागा कमी आणि घरांची मागणी मात्र अधिक,अशी स्थिती आहे! गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने २१ ऑगस्ट २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घराच्या प्रश्नावर कामगार संघटनेने भेट घेऊन चर्चा केली होती. कृती संघटनेने सूचविलेल्या कोणत्याही तोडग्याचा शासनाने अद्याप पर्यंत तरी विचार केलेला नाही.उलट राज्य सरकार मागील सरकारच्या काळात सोडतीत लागलेल्या घराचे वाटप करीत आहेत,पात्रता निश्चिती प्रकरणात अतार्किक अटी लादून कामगारांना घरे कमी कशी मिळतील,असा प्रयत्न होत आहे.त्या मुळे कामगारांम ध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

    या प्रश्नावर गिरणी कामगार कृती संघटनेने मुंबईतील सर्वच आमदारांना एक मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले आहे. गिरणी कामगारांच्या या जिव्हाळ्याच्या आणि हक्काच्या प्रश्नावर विधान सभेत त्यांनी आवाज उठवावा आणि आझाद मैदानावरील कामगारांच्या आक्रोश आंदोलनात कामगारांना मार्गदर्शन करावे,अशी आग्रही विनंती कामगार संघटना कृती कृती संघटनेच्या वतीने सन्माननिय आमदारांना करण्यात आली आहे.त्यामुळे कामगारांच्या आक्रोश आंदोलनाचे पडसाद आता विधान सभेतही उमटणार आहेत! विधानसभा अधिवेशन २६ फेब्रुवारी ते १मार्च पर्यंत चालू रहाणार आहे.

    येत्या २७ रोजीचे आक्रोश आंदोलन झोपेचे सोंग घेतलेल्या 

सरकारला जागे करणारे ठरावे,असे आवाहन कामगार नेते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मागील धरणे आंदोलनात केले होते.त्यानुसार महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात सभा घेण्यात येत आहेत.कोल्हापूर येथे संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या सभेत सचिन अहिर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घेतलेली सभा चांगलीच गाजली आहे.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण आणि आण्णा शिर्सेकर यांच्या द्वारे मालवण येथील सभा गिरणी कामगारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास महत्त्वाची ठरली आहे.पुणे,सातारामधील सभा समाजसेवीका उज्वला भगत, कार्यकर्ते विलास जगताप आणि संघटन सेक्रेटरी नामदेव झेंडे यांच्या प्रयत्नाने पार पडत आहेत. 

    सावंतवाडी आणि आजुबाजुच्या कोकणपट्टीतील गिरणी कामगारांमध्ये जनजागृतीसाठी उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांनी प्रचाराची राळ उठविण्याचा निर्धार केला आहे. 

    घरे लाभलेल्या किंवा घरा पासून वंचित असलेल्या हजारो कामगारांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.

     कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे आणि सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर विविध गिरणी काम गार संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून २७ तारीखेचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करीत आहेत.

     मु़ंबईत कामगार आघाडीचे कार्यकर्ते असलेल्या डिलाईल रोड, घाटकोपर येथे महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे सभा घेणार आहेत. घाटकोपर आणि आजुबाजुच्या परिसरातील गिरणी कामगारांसाठीची सभा सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घाटकोपर,पूर्व येथील पराग हायस्कूलच्या पटांगणावर पार पडणारआहे.

   काही अपरिहार्य कारणास्तव लाखभर गिरणी कामगार शासनाच्या घरकुल योजनेला दुरावले आहेत,अशा कामगारांसाठी सरकारने फॉर्म भरण्याची एकदा संधी द्यावी,अशी या आंदोलनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. गिरणी कामगारांना त्यांच्या कर्मभूमीत म्हणजे मुंबईत घरे मिळालीच पाहिजे,ही मागणीही पुढे आल्याने गिरणी कामगारांमध्ये या आंदोलना विषयी औस्त्युक्य निर्माण झाले आहे.तेव्हा हे आंदोलन कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहून, यशस्वी करतील,असा

विश्वास कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजीमंत्री सचिन अहिर, गिरणी कामगार कृती संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी‌ कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश 

 भिलारे,सेक्रेटरी जयंवत गावडे,संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल.हे आदोलन यशस्वी होण्यासाठी चाळ रहिवासी कृती समितीचे पदाधिका री भाऊसाहेब आंग्रे,किरण गावडे, महेश हेंद्रे यांच्यासह कामगार, रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे ठरविले आहे.येत्या २७ तारखेचे गिरणी कामगारांचे आक्रोश आंदोलन "न भुतो न भविष्याती!" ठरेल,असा सर्वत्र विश्वास

 व्यक्त होताना दिसतो आहे!

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel