सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे वैशाली हिंगोले यांचे सलग तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण चालूच...*

*उपोषण कर्त्या महिलेची तबेत खालावण्याची शक्यता परंतु प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष् 

नांदेड:-(प्रतिनिधी)कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत होत असलेली कामे फौजी कंट्रक्शन व सादलापुरे कंट्रक्शन या गुत्तेदारांमार्फत केली जात आहेत. सदरील कामे हि थातुर मातुर स्वरुपाची व निकृष्ट दर्जाची करीत असून इस्टीमेट प्रमाणे होत नाहीत. त्या कामाची चौकशी गुणनियंत्रण कक्षा मार्फत करुन चौकशी अंती संबंधीत गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करुन त्या गुत्तेदारास काळ्या यादीत टाकावे व त्यांना कोणतेही धनादेश अदा करण्यात येवू नये या मागणीसाठी वैशाली कृष्णा गुंजरगे (हिंगोले) ह्या दि. १२ फेब्रुवारी पासून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु कार्यकारी अभियंता यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही. उपोषणाचा आज तिसरा दिवस संपला असून उपोषण कर्त्या महिलेची तबेत खालावली असल्याचे दिसून आले.

सविस्तर वृत्त असे की,कंधार तालुक्यात कुरुळा सर्कल मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत खूप मोठया प्रमाणात कामे चालत असून ती कामे पूढील प्रमाणे आहेत - हणमंतवाडी ते कुरुळा काँक्रिट रोड, पुलाचे बांधकाम, नाली, कुरुळ ते बोळका या रोडवर दोन पूल, कुरुळा ते वहाद मोहजा या रोडवर दोन पूल, कुरुळा रोडचे कॉक्रीट काम सध्याला सुरु असून सदरील कामे ही फौजी कन्स्ट्रक्शन कंपनी कडून केली जात असून सदरील कामे ही विहित अंदाज पत्रकात नमुद तरतुदींचा भंग करुन सुमार दर्जाचे करण्यात येत आहे. सदरील कामाला सुरुवात केली असली तरी के अद्यापही माहिती दर्शक फलक लावण्यात आलेला नाही. सदरील काम हे इस्टीमेंट नूसार होत नसून थातुर मातुर स्वरुपाचे व निकृष्ट दर्जाचे होत आहे. सदरील कामावर सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांचे कोणतेही लक्ष व नियंत्रण दिसून येत नाही. कामाचे ठिकाणी आपल्या विभागातील वरील कर्मचाऱ्यांचे विमा लक्ष नसल्यामुळे कमी क्षमतेच्या मशीन व अकुशल कामगार वापरुन काम पुर्णत्वास नेण्याचा असफल प्रयत्न केला जात आहे.

    तसेच कंधार उपविभाग सा.बां. अंतर्गत कुरुळा सर्कल मध्ये नेहरुनगर ते कुरुळा, उमरगा, दिग्रस रोडचे डांबरी करणाचे काम चालू आहे. सदरील काम हे सादलापुरे कंट्रक्शन नामक गुत्तेदारास दिले असून तो गुत्तेदार संबंधीत कामे ही ईस्टीमेट नूसार करत नसून निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. वरील दोन्ही गुत्तेदार 
विहित अंदाजपत्रका नुसार नमुद तरतुदींचा भंग करुन सुमार दर्जाची कामे करण्यात आली आहे. असे उपोषण कर्त्या म्हणाल्या. जोपर्यंत संबंधित गुत्तेदार यांच्यावर योग्य ती कारवाई होणार नाही तोपर्यंत माझे उपोषण चालूच राहिल असे हि त्या म्हणाल्या.
प्रतिक्रिया 
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तोंडले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की संबंधित सादलापुरे आणि फौजी कन्स्ट्रक्शन यांच्या दोन्ही कामाची मी पाहणी केली असून सदरील कामे हे चांगल्या स्वरूपामध्ये करण्यात आलेली आहेत फौजीचे दीप कन्स्ट्रक्शन काम देखील ब्रिजचे काम पूर्ण झाले असून त्यांचं काही एक तक्रार नाही


टिप्पण्या