सरकार, मालक व राजकीय पक्षापासून अलिप्त आणि लोकशाही मार्गे प्रजातंत्र पद्धतीने कामगार हितासाठी काम करीत असलेल्या हिंद मजदूर सभा या केंद्रीय कामगार संघटनेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन ३ ते ५ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथील आमदार भवन प्रांगणात होत आहे. या अधिवेशनाला हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष राजा श्रीधर, महासचिव हरभजन सिंग सिद्धू, कामगार नेते शिवगोपाल मिश्रा, संजय वढावकर, जे.आर.भोसले, वेणू नायर ,राजेंद्र सिंग, उमाशंकर मिश्रा, एस. डी. त्यागी, सुधाकर अपराज, मिलिंद कांदळगावकर डॉ.तुषार प्रधान, मुकेश गालव, चंपा वर्मा, विद्याधर राणे आदी कामगार नेते व आंतरराष्ट्रीय कामगार नेते उपस्थित असून मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात जानेवारी २००४ पासून भरती झालेल्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व चार लेबर कोर्ट रद्द करणे या व इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत कामगार प्रतिनिधी मध्ये चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. अधिवेशनासाठी देशातील विविध राज्यातील हिंद मजदूर सभेची संलग्न असलेल्या कामगार संघटनांचे दोन हजार कामगार प्रतिनिधी उपस्थित आहेत. हिंद मजदूर सभा अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर आमदार निवास प्रांगणात युवक व महिलांचे देखील संम्मेलन घेण्यात आले. या अधिवेशनाला आय. एल. ओ., आय. टी. एफ., आय. टी. यु. सी. इत्यादी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असून देशातील सीटू, आयटक, इंटक इत्यादी केंद्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. असे कामगारांचे प्रतिनिधी मारुती विश्वासराव कळवित आहेत.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिके...
-
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी ) – येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे ...
-
नांदेड: प्रतिनिधि गेल्या ७२ तासांत सलग पाच खुनाच्या घटनांनी नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शिंद...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
सांगली जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक कृष्णात पाटोळे यांनी संपादित केलेले 'मायलेकींचा पत्रसंवाद' हे पुस्तक नांदेडच्या सायास पब्लिके...
-
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी ) – येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती (गुरु प. पू. अच्युत भारती महाराज) (वय ९५) यांचे ...
-
नांदेड: प्रतिनिधि गेल्या ७२ तासांत सलग पाच खुनाच्या घटनांनी नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शिंद...
-
दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन माहूर – हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्त...
-
- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या सीनियर वुमन्स वन डे इन्व्हिटेशन लीग 2026-27 यासाठी शुभम क्रिकेट अकॅडमीच्या धडाकेबाज व...


COMMENTS