नवी मुंबई सानपाडा येथील नागरिकांनी कै.सिताराम मास्तर उद्यानातील ओपन जिमचे नादुरुस्त साहित्य नवीन बसविण्याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील उद्यान अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. ही दुरुस्ती सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुप सात पन्नास व इतर गार्डन ग्रुपच्या नागरिकांनी लोक वर्गणीतून करण्याच्या निर्णय घेटला व तसे निवेदनही नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. दिलीप नेहरकर यांना दिले होते. अखेर सानपाडा सात पन्नास गार्डन ग्रुप इतर गार्डन ग्रुपच्या प्रयत्नाला यश येऊन कै. सिताराम उद्यानातील ओपन जिमचे साहित्य बसविण्याच्या कामकाजाला आज उद्घाटन होऊन सुरुवात झाली. याप्रसंगी सानपाडा येथील नगरसेवक सोमनाथ वासकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुप सात पन्नासचे पदाधिकारी, तावडे, रणवीर पाटील, तेजाभाई वाघेला, मारुती शिंदे, विकास वाघुले, सुधाकर वाणी, अप्पा देशमुख, लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा