शिक्षक- शिक्षकेतर पतसंस्थेचा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न.





मुंबई - सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतर्फे नुकताच राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, मजदूर मंझील, गं.द .आंबेकर मार्ग परेल, मुंबई - १२ येथे" "पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार" व संस्थेतील शाखानिहाय ठेवीदार व विश्वासक असणाऱ्या सभासदांना सन्मानचिन्ह देऊन गोरविण्याचा सोहळा आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रविण दरेकर , आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य अध्यक्ष मुंबै बँक ,मा. श्री. प्रसाद लाड ,आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य ,संचालक मुंबै बँक व सुप्रसिद्ध साहित्यिक व कवि. प्रा. श्री. प्रविण दवणे उपस्थित होते. 

यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रविण दवणे यांनी एकाग्रता आताच्या पिढीत रुजवून त्यांना सक्षमपणे समाजात उभं करण्याच्या गरजेवर भर दिला. तर मुंबै बॅकेचे अध्यक्ष ,आमदार प्रविण दरेकर यांनी पगारदार पतसंस्थांच्या पाठिशी मुंबै बॅक सदैव उभी राहिल अशी ग्वाही दिली .

पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील, उपाध्यक्ष श्री. किशोल मुरलीधर पाटील सहसचिव श्री. सतिश ज्ञानदेव माने व खजिनदार संतेश शहाजी शिंदे , सह महाराष्ट्र राज्यातील २८ शाखांचे प्रतिनिधी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला.


टिप्पण्या