*शिख समाजामध्ये साफसफाई व स्वच्छतेला फार मोठें महत्त्व आहे.या मुळे कोणत्याही गुरूद्वाऱ्याच्या दर्शनासाठी गेले असता सगळीकडे चांगली साफ सफाई व स्वच्छता व मनमोहक वातावरण असल्याचे अनुभवास येते. यांमुळेच गुरूद्वाऱ्याचा पायऱ्या जवळ पाय धुण्यासाठी चरणगंगा बांधलेली असते.*
*नांदेड मध्ये दीपावलीच्या आदल्या दिवशी गोदावरी नदीतुन प्रत्येक घरातील महिला पुरुष व आलेले हजारो यात्रेकरू आप आपले स्वतःचे घागर, बादल्या अथवा अन्य कुठलाही प्रकारचे भांडे घेऊन गोदावरी नदीच्या पात्रातून तीन फेऱ्या पाणी भरून व गुरूद्वाऱ्याचा आतील विहीरीतुन पाणी घेऊन गुरूद्वाऱ्याचा वर पासून खाल पर्यंत सर्वांच्या सर्व काना कोपरा धुवून स्वच्छ सुंदर चकचकीत करतात.*
*विषेश बाब म्हणजे ह्या वेळी गुरूद्वाऱ्याचा गाभाऱ्यात असलेल्या सर्व शंत्राना गाभाऱ्याच्या बाहेर काढून साफ सफाई करून व सर्व शंत्राचीं नोंद घेऊन संध्याकाळपर्यंत सर्व परत गाभाऱ्यात ठेवल्या जाते
*ही गुरूद्वारा तखतस्नान ची परंपरा तीन शे वर्षांपूर्वी पासून चालू आहे. संध्याकाळी संपूर्ण गुरूद्वाऱ्याचा भागात दीवे व लाईटींग द्वारे रोशनाई करून सुशोभित केले जाते. सकाळच्या तखतस्नान व संध्याकाळ चे रमणीय दृश्य पाहण्यासाठी स्थानिक लोकांच्या सोबत देश विदेशातील सर्वधर्मीय असंख्य भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. तरी सर्व नांदेडच्या सर्व नागरिकांना आवाहन आहे की ह्या जगभरातील आगळ्यावेगळ्या तखतस्नान संपूर्ण संभारंभाचा सर्वांनी फायदा घ्यावा*
*यंदा ह्या तखतस्नान ची सुरुवात सकाळी साडे आठ वाजल्यापासून दिनांक 11 नोव्हेंबर शनिवारी होईल*
*राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू अबचलनगर नांदेड 7700063999*
addComments
टिप्पणी पोस्ट करा