वसईत दिवाळीनिमित्त न्यूसीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन



वसईत दिवाळी निमित्त नॅशनल युनियन सिफेअरर्स ऑफ इंडियातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी १० नोव्हेंबर २०२३ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

  नॅशनल युनियन ऑफ सिफेअरर्स ऑफ इंडियाच्या वसई शाखेतर्फे सेंट थॉमस हायस्कूल, देवतलाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध लेखन, वेष -भूषा, दिवाळी कंदिल बनविणे, टाकाऊ वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करणे , फॅब्रिक पेंटिंग अशा स्पर्धांचा समावेश होता. स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक ते १० वी. पर्यंतच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्युसीचा महिला विभाग व वसई टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपला 

मारुती विश्वासराव


टिप्पण्या