ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली

 

आज मौजे अचवला येथे ग्रामीण महिला विकास संस्था देवणी व ग्रामपंचायत अचवला यांच्या वतीने ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली निवड केलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली.

    या बैठकीमध्ये

  * बालकांवर परिणाम करणाऱ्या प्रमुख समस्या.

  * ग्राम बाल संरक्षण समितीची रचना.

  * ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य.

  * ग्राम बाल संरक्षण समितीच्या. बैठका,अहवाल,नियम.

  * बाल विवाह रोखण्याच्या प्रक्रियेत ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिका, जबाबदाऱ्या या विषयावर बैठक घेण्यात आली.यावेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.



  *बैठकीत बालकांच्या सरंक्षण, बालविवाहाविषयी जाणीव जागृती करणे.

ज्या घरात बालविवाह होण्याची शक्यता आहे त्या कुटूंबावर लक्ष ठेवणे समुपदेशन करणे.

बाल विवाह होऊ द्यायचा नाही.

मुलीच्या उच्च शिक्षणासाठी समुपदेशन करणे,बाहेरगावी शिक्षणासाठी वाहनांची व्यवस्था करणे.

समितीच्या बैठका नियमित ठेवणे.

मुला-मुलींच्या बाबतीत जागरूक राहणे.* 

    या विषयावर ठराव करण्यात आला.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज