सांडपाणी व्यवस्थापनासह इतर प्रश्न सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले.


 नांदेड, 6- तरोडा बुद्रुक येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर नांदेड येथे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापनासह इतर प्रश्न सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले.   रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी विकास नगर येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटीच्या कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन डॉ. श्याम दवणे, सचिव परमेश्वर दिपके, नगरसेवक धम्मा कदम, पांडुरंग तारू, श्याम हटकर, मिलिंद व्यवहारे, गंगाधर सोनाळे, सुमेध पाईकराव, प्रतिक कावळे, भीमराव भद्रे, शंकर ईरलोड, दिलीप ढगे, अँड. वाघमारे, लोहाळे, दीपक कांबळे, लक्ष्मण सोनसळे, येरणाळीकर, सूर्यवंशी, शातांबाई औराळकर, खपले ताई, अर्चना दिपके, शीलाताई तारु, डोंगरे ताई, मयुरी दिपके आदींची उपस्थिती होती. 

     या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी त्यांनी विकास नगर गार्डनमध्ये दहा बाकडे आणि ओपन जिम देण्याचे जाहीर केले. टप्प्याटप्प्याने विविध कामे करून नगरीचा विकास केला जाईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी सोसायटीच्या वतीने डॉ. श्याम दवणे यांनी पुष्पहाराने आमदार कल्याणकर यांचा सत्कार केला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी नागरिकांशी संवाद साधला.
टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज