भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०१७ पासून झालेल्या वेतन कराराची थकबाकी, मुंबई बंदरातील गोदी कामगारांना आर्थिक कारणामुळे एकरकमी देता आली नाही. सदर थकबाकी हप्ता हप्त्याने देण्यात आली. शेवटचा उर्वरित १५ टक्के थकबाकीचा हप्ता सप्टेंबर महिन्यात देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी युनियनच्या शतकपूर्ती महोत्सवी सोहळ्यात दिले होते. त्याप्रमाणे ६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या बोर्ड मिटिंग नंतर बोर्ड मेंबर दत्ता खेसे व कल्पना देसाई यांनी चेअरमन राजीव जलोटा यांची भेट घेऊन गणपतीपूर्वी थकबाकीचा शेवटचा हप्ता मिळावा अशी विनंती केली. त्यावेळी मुख्य लेखाधिकार्यांच्या प्रस्तावास चेअरमन जलोटा यांनी मान्यता दिली.
त्याप्रमाणे येत्या १२ सप्टेंबरला सेवेत असणारे प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकारी, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सेवानिवृत्त प्रथम व द्वितीय अधिकारी
१३ सप्टेंबरला सेवेत असणारे तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी,
१४ सप्टेंबरला निवृत्त झालेले फो चतृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी,
१५ तारखेला निवृत्त झालेले प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकारी यांना थकबाकीचा शेवटचा हप्ता बँक खात्यात जमा होईल.
थकबाकी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, सरचिटणीस सुधाकर अपराज व त्यास सहकार्य देणारे मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, मुख्य लेखाधिकारी श्रीमती माधुरी वराडे व संबंधित अधिकारी या सर्वांना शुभेच्छा
addComments
टिप्पणी पोस्ट करा