बेटमोगरा येथील १४ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू

मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

                    तालुक्यातील बेटमोगरा येथील चांदणी गणेश नवलेकर या चौदा वर्षीय मुलीचा दि.७ सप्टेंबर रोजी डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.

 ४ सप्टेंबर रोजी तिला ताप आला होता. चांदणी नवलेकर याची तब्येत खुप बिघडल्यामुळे तीला उपचारासाठी त्याच दिवशी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तीला डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तिन दिवसांच्या उपचारानंतरही तीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तीला पुढील उपचारासाठी दि.६ सप्टेंबर रोजी तिला नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालयात पाठविण्यात आले. पण प्रकृती अधिकच गंभीर झाल्यामुळे तीचा उपचारादरम्यान दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास निधन झाले.

चांदणी गणेश नवलेकर ही बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेत पाचव्या वर्गात शिकत होती. एकीकडे या लहान मुलीचा डेंग्यूमुळे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे तर दुसरीकडे डेंग्यूला रोखण्याचे दावे करणारे बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने याकडे मात्र साफ दुर्लक्ष करून हातावर हात ठेवून गप्प बसले आहे. चांदणी नवलेकर हिचे डेंग्यूमुळे निधन झाल्यानंतरही तीचे दोन भाऊ हे पण तापीने ग्रस्त असतांना अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्या दोन मुलांची तपासणी केली नाही.तसेच डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या परिसरात आरोग्य विभागाकडून कोणतेच उपाययोजना होत नसल्यामुळे बेटमोगरा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज