मुंबई येथील राज्य कर सह-आयुक्त विभागात कार्यरत असलेले आबाजी वडजे पाटील यांची सेवानिवृत्ती

  मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी  राज्य कर सह-आयुक्त (मुख्यालय-२) वस्तू व सेवाकर विभाग मुंबई येथील कार्यरत असलेले आबाजी पांडुरंगराव वडजे ...

 



मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी


 राज्य कर सह-आयुक्त (मुख्यालय-२) वस्तू व सेवाकर विभाग मुंबई येथील कार्यरत असलेले आबाजी पांडुरंगराव वडजे पाटील धामणगावकर यांची प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर महाराष्ट्र शासनाने आदर्श अधिकारी म्हणून त्यांची सन्मानाने कार्यपूर्ती केली आहे.


          मुखेड तालुक्यातल्या ग्रामीण भागातील धामणगाव या गावातील एका शेतकरी कुटुंबात आबाजी वडजे पाटील यांच्या जन्म झाला. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेले आबाजी वडजे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुळ गाव धामणगाव येथील शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी त्या काळात वाहनांची जास्त व्यवस्था नसतांनाही त्यांनी चार किमी अंतरावर असलेल्या बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळेत पायी प्रवास करुन दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आकरवी व बारावीचे शिक्षण देगलूर येथील महाविद्यालयात पूर्ण केले.

       वडील बंधू जिवनराव पाटील वडजे यांच्या मदतीने पुढील शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तव्य करून बी.कॉम व एम.कॉम हे नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात पूर्ण केले. यासोबतच एक विशेष बाब म्हणजे आबाजी वडजे पाटील यांनी एम.कॉम करत असताना आपल्या शिक्षण खर्चाची तडजोड व्हावी म्हणून कॉमर्स ट्युशन घेऊन स्वतः शिक्षण खर्चाची व्यवस्था केली.

यानंतर आपले शिक्षण संपल्यानंतर तासिकां तत्वावर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे सिनीयर कॅालेजमधे प्राध्यापक म्हणुन काम पाहीले. तसेच गोदावरी मनावर महाविद्यालय शंकरनगर ता. बिलोली येथे सिनियर कॅालेजमधे प्राध्यापक पदावर कार्य केले. 


                      दरम्यान एम.पी. एस.सी मध्ये इ.सन १९९१ मधे यश व वित्त व लेखाधिकारी वर्ग-२ पदी निवड. त्यानंतर इ.सन ३० डिसेंबर १९९३ मध्ये नांदेड येथे अप्पर कोषागार अधिकारी या पदावर कार्य केले. त्यानंतर आबाजी वडजे पाटील यांची एम पी एस सी १९९३ मधे विक्रीकर अधिकारी वर्ग -१ पदी निवड. या सेवेत दि.११ जुलै १९९५ मध्ये रुजू झाले. 

                               आबाजी वडजे पाटील दिलचस्पी ने कामगिरी करत त्यांनी प्रथम माझगाव, व त्यानंतर चर्चगेट व नंतर अंमलबजावणी शाखा अ या विभागात कार्य केले. त्यानंतर २००३ मधे सहाय्यक विक्रीकर आयुक्तपदी (आताचे राज्यकर उपायुक्त ) प्रमोशन.

विक्रीकर उपायुक्त / राज्यकर उपायुक्त या पदावर नरीमन पॅाईंट विभागात प्रशा. ३ पदी कार्य केले. तसेच त्यांनी बिजनेस अॅाडीट,एल टी यु , व्हिजीलन्स,अंमलबजावणी शाखा ब व आयुक्त कार्यालयात राज्यकर उपायुक्त तथा सह निबंधक चिटफंड मुंबई पदी कार्य केले. एल टी यु , व्हिजिलन्स व अंमलबजावणी शाखेत विशेष कामगिरी व ३० सप्टेंबर २०१९ पासून सेवानिवृती पर्यंत राज्यकर सहआयुक्त या पदावर कार्य केले.

शिक्षणासोबत सामाजिक कार्याची जाणीव करत सामाजिक बांधिलकी जपत आबाजी वडजे पाटील यांनी कोरोना काळात कार्यालयातील सेक्युरिटी स्टाफच्या जेवणाची सोय स्वतःच्या योगदान व ईतर मित्राकडुन मदत घेऊन केली. तसेच मुळ गाव धामनगांव येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सय्यद बाबु पीरच्या संदलनिमित्त बाहेर गावातून येणाऱ्या सर्व भाविकांना गेल्या वीस ते बावीस वर्षापासुन वडजे कुटूंबीयाच्या मदतीने खिचडीचा जेवणाची सुविधा पुरवण्याचे कार्य अव्याहतपणे चालू ठेवले आहे. यासोबत गावात शेतरस्ते नसल्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन शासकीय योजनेतून एक दिड कि.मी चा रस्ता मंजुर करून घेतला, व त्यांच्या पुतण्या पदमसिंह वडजे पाटील,ग्रापंचायत व गावातील नागरिकांच्या सहकार्यातुन तो पुर्णत्वास येतो आहे.


                      तसेच मुखेड येथे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या आशिष वडजे मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यासाठी वातानुकुलीत लायब्ररी सुरू केली. व तिथे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली.

अनेक गरजू व हुशार विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत केली. यापैकी पुण्यातील युनिक अकॅडमीचे संस्थापक सदस्य व आता राजमुद्रा अकॅडेमीचे संस्थापक मनोहर भोळे असुन त्यानी याबाबतचा उल्लेख त्यांच्या “आयुष्य घडतांना “ या पुस्तकात नमूद केला आहे.

     यापुढील आयुष्यात मुखेड तालुक्यातील गरजु ग्रामीण तरुण तरूणी , शेतकरी , शेतमजुर यांच्याजीवनामधे आमुलाग्र बदल करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस त्यांच्यात पहायला मिळत आहे. अशा अनेक विविध शासकीय पदावर एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांनी कामगिरी पाहिली असून महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य कर सह-आयुक्त (मुख्यालय-२) वस्तू व सेवाकर विभाग मुंबई येथील कार्यरत असलेले आबाजी पांडुरंगराव वडजे पाटील धामणगावकर यांची प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर त्यांची सन्मानाने कार्यपूर्ती केली आहे. त्यांचे शैक्षणिक आवड त्यात मिळवलेले यश, सामाजिक कार्य,विविध पदांवरील कामगिरी अशा सेवेनंतर झालेली कार्यपूर्तीने आबाजी वडजे पाटील यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group