दादरमध्ये महागाई विरोधात भाजीची आगळी वेगळी दहीहंडी*


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट माहीम विधानसभा आणि धगधगती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या केशव दाते उद्यान कुंभारवाडा येथे गृहिणींना लागणाऱ्या रोजच्या जीवनात प्रत्येकाला लागणाऱ्या भाज्यांचे दर वाढत आहेत,सरकारचे याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व वाढलेली महागाईचे दर कमी करावेत म्हणून अशी हंडी बांधली जाणार आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये प्रचंड महागाई होऊन कांदेचे दर वाढले होते,त्यावेळी आघाडी सरकार विरोधात अशी हंडी बांधली होती, आता सुद्धा सर्व भाज्यांचे दर वाढत आहेत. टोमोटो,कांदे सह इतर भाज्यांचे दर वाढल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दहीहंडी पथकास भाजीची टोपलीचे सन्मानचिन्ह,रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.त्याचबरोबर आकर्षक बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत. गोविंदा पथकाची सात थरासाठी २२२२/ रुपये तर सहा थरासाठी ११११/ रुपये,पाच थरासाठी ५०१ रुपये असे एकूण ३,५० लक्ष रुपयांची दहीहंडी होणार असून काही आकर्षक बक्षिसे सुद्धा गोविंदा पथकांना दिली जाणार आहेत.या बक्षीसासोबत भाजीची टोपली सन्माचिन्ह म्हणून देणार आहे. अशी बक्षिसाची लूट होणार आहे.

   त्यामुळे पुन्हा एकदा दादरमध्ये कांद्यासारखी महाग झालेल्या भाजीची दहीहंडी पाहण्याचा योग बाळगोपाळांना आणि नागरिकांना मिळणार आहे. सदर भाजीच्या हंडीचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपविभागप्रमुख यशवंत विचले आणि धगधगती मुंबई यांनी केले आहे.

   तरी सर्व दहीहंडी पथकांनी अवश्य भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या