नवी मुंबईत नेरूळ येथे नाविक कामगारांचा कौटुंबिक मेळावा*


नवी मुंबईत नेरूळ येथे भीमाशंकर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळील अक्षता हॉलमध्ये नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या वतीने ९ सप्टेंबर २०२३ रोजी नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भरपूर गर्दी जमली होती. कारण शेकडो नाविक आणि त्यांचे कुटुंब सहभागी झाले होते.

नाविक कामगारांच्या या कौटुंबिक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेरिटाइम युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस कॅप्टन तुषार प्रधान उपस्थित होते. सन्माननीय पाहुणे कॅप्टन आपंडकर, प्राचार्य टी.एस. रेहमान, MASSA चे CEO कॅप्टन हल्बे, आणि अँगलो इस्टर्नचे महाव्यवस्थापक कॅप्टन दीपक कोरीया व इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी नुसीच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले, आणि संघटनेच्या कामगार कल्याणकारी विविध उपक्रमांना मनापासून पाठिंबा दिला. 

आपल्या प्रमुख भाषणात नुसिचे सरचिटणीस मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले की, भविष्यात नाविक कामगारांच्या हितासाठी अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातील. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, "आम्ही आमच्या खलाशांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत."

या कार्यक्रमात तरुणांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. संगीतमय मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सादर केलेले सांस्कृतिक नृत्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे होते.

 या कार्यक्रमाला खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांचा चांगला सहभाग मिळाला. नवी मुंबईत न्यूसीचा हा एक ऐतिहासिक कौटुंबिक मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या