*संकटे किती जरी आली तरी पतसंस्था ठेविदारांचे हित रक्षण करील! गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष‌ काशिनाथ माटल यांची ग्वाही,!*

       मुंबई दि.९: सहकारावर किती जरी संकटे आली तरी पतसंस्था ठेविदारांचे हितरक्षण करील!अशी ग्वाही गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक का...

 


     मुंबई दि.९: सहकारावर किती जरी संकटे आली तरी पतसंस्था ठेविदारांचे हितरक्षण करील!अशी ग्वाही गोकुळधाम पतसंस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक काशिनाथ माटल यांनी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.

   गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी सुरू केलेल्या पहिल्या 

गोरेगाव उपनगरातील गोकुळधाम पतसंस्थेची ३६वी सर्वसाधारण सभा 

गोरेगावच्या यशोधाम हायस्कूल मध्ये शनिवारी पार पडली.त्या वेळी काशिनाथ माटल अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रारंभी सेक्रेटरी श्रीपदराव दिवेकर यांनी सन २०२२-२३ चा वार्षिक नफा-तोटा अहवाल सभेत मांडला त्याला सभागृहाने मंजुरी दिली.

   मुबईतील गिरण्याण्या बंद होताच कामगारांच्या सहकारी पतसंस्थां चा गाशा गुंडाळला गेला. परंतु सहकाराची ओढ असलेल्या गिरणी कामगारांनी विभागा-विभागामध्ये सहकारी पतसंस्था स्थापन केल्या. त्यामधीलच एक गोकुळधाम सहकारी पतसंस्था असून,सुदन कोरगावकर,बाबाजी परब,विठ्ठल दुधवडकर या दिवंगत तर श्रीपतराव‌ दिवेकर,श्रीधर तानावडे,सत्यवान राणे या जुन्या काळातील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी गोकुळधाम कामगार वस्तीत ही संस्था उभी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले,असे सांगून काशिनाथ माटल म्हणाले,फाऊंडर संचालक म्हणून नेतृत्व करण्याची आपल्याला संधी मिळत आहे,या बाबत समाधान व्यक्त करुन अध्यक्ष काशिनाथ माटल म्हणाले, आज मुंबईतील असंख्य पतसंस्था अनेक अडचणींना तोंड देत तगधरून उभ्या आहेत.सहकाराचा मंत्र जिवंत ठेवण्या-या या पतसं स्थेचे गा-हाणे कानावर घालण्यासाठी लवकरच शशिष्टमंडळ राज्य सरकारला भेटेल असेही काशिनाथ माटल म्हणाले, गणेशोत्सव तोंडावर असतानाही गोकुळधाम सदस्यांनी चांगलीच उपस्थिती लावली.विशेषत:महिला सदस्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.खजि नदार शिवाजी खरात, संचालक अनंत शिंदे, गोविंद आजगाव कर,लक्ष्मण भेलसेकर,लक्ष्मी बाबाजी परब या संचालकांनी सभेत भाग घेतला.व्यवस्थापक श्रीमंती जया चव्हाण,तर अभिजित शेलार नितिन राणे या सहाय्यकांचे सभेला मोलाचे सहकार्य लाभले.कर्जदारांना दोन टक्के कर्ज व्याजात सवलत देणे आणि प्रत्येकी किमान ५००रु. शेअर भांडवल‌ उभारणीच्या ठरावांना सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.अर्जुन लोके, लक्ष्मण भांडे,पी.डी.सावंत आदींनी ठरावांना अनुमोदन देतांना पतसंस्थेच्या वाटचालीवर समाधान व्यक्त केले.एकूण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.•••

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group