*सानपाडा येथील नागरिकांच्या वतीने समाजसेवक सोमनाथ वास्कर यांचा सत्कार*


नवी मुंबई सानपाडा विभागातील सर्वाधिक पसंतीचे कार्याभिमुख लोकप्रिय नेतृत्व कार्यसम्राट शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे उपशहरप्रमुख सोमनाथ वास्कर यांचा ३ ऑगस्ट २०२३ रोजी सानपाडा येथील कै . सिताराम मास्तर उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब योगा ग्रुप, गार्डन परिवार, ७.५० गार्डन ग्रुप, क्रीडा प्रेमी, सानपाडा गाव व इतर नागरिकांनी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला. सोमनाथ वास्कर नेहमीच लोकांच्या सुख दुःखाला धावून जातात. शाळा, कॉलेज ऍडमिशन, हॉस्पिटलमधील पेशंटना गरज लागल्यास मदत, ज्येष्ठ नागरिकांना मदत, सर्व सर्वसामान्यांना लागणारी अत्यावश्यक सेवा इत्यादी लोकोपयोगी कामे सोमनाथ वास्कर सातत्याने करीत असतात. त्यामुळे ते गेली १५ वर्षे सानपाड्यामधील लोकप्रिय समाजसेवक व नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. वाढदिवसानिमित्त सोमनाथ वास्कर यांनी सर्वांना मोफत नाश्ता दिला. सिताराम मास्तर उद्यानात झालेल्या सोमनाथ वास्कर यांच्या सत्कार प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शाखाप्रमुख अजय पवार, भाजपाचे समाजसेवक भाऊ भापकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, आरएसएसचे अजय मुडपे, अविनाश गव्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, बळवंतराव पाटील . सचिव राजाराम खैरनार, खजिनदार ‌विष्णुदास मुखेकर, रत्नकोकण हॉटेलचे मालक व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष बारवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक भगवान शेजाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
मुंबई शहराचा कणा असलेला कामगार मुंबईतून हद्दपार झाला _* अशोक नायगावकर
इमेज