मुंबई - लोहमार्ग पोलीस, मुंबई आणि
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम्.डुंगरसी महाविद्यालय
(समाजकार्य पदविका अभ्यासक्रम बॅच)
यांच्या संयुक्त विद्यमाने "रेल्वे सुरक्षा...
आपली सर्वांची जबाबदारी" अभियान २०२३ अंतर्गत एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेले 'खाकीतील सखी ' या महिलांच्या सुरक्षेविषयी अभियानाची माहिती यावेळी देण्यात आली. दादर रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थ्यांनी रेल्वे सुरक्षा जागृतीपर पथनाट्य यावेळी सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, लोहमार्ग पोलीस,
सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. सुनील गावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दादर लोहमार्ग पोलीस, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीम. स्मिता ढाकणे यांनी रेल्वेच्या विविध योजना, महिला सुरक्षा याविषयी माहिती दिली. कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. डी. व्ही. पवार तसच विभागप्रमुख, डॉ.विठ्ठल सोनटक्के यांनी कीर्ती कॉलेजच्या सामाजिक कार्य पदविका अभ्यासक्रम आणि इतर विविध अभ्यासक्रमांची माहिती करून देतानाच रेल्वे सुरक्षा किती महत्वाची आहे हे सांगितलं. रेल्वे सुरक्षा आणि माध्यमाचा सकारात्मक वापर या विषयावर श्रीम. तृप्ती राणे यांनी मार्गदर्शन केले. 'सर्व विथ श्रद्धा' या संस्थेच्या संस्थापिका श्रीम.श्रद्धा सिंग यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
कीर्ती कॉलेजच्या डॉ.घुमरे मॅडम तसेच प्रा.रोहन राजापकर आणि प्रा. अमेय महाजन यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत, नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत रेल्वे सुरक्षेसारखा अत्यंत महत्वाचा विषय पोहचविण्याचे काम केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा