मुंबई झोपडपट्टीतील आयपीएस सय्यद हुसेनचा गोदी कामगार संघटनेतर्फे सत्कार*


मुंबईच्या वाडीबंदर येथील सोलापूर स्ट्रिटवर झोपडपट्टीत राहणारा मुलगा कुमार सय्यद हुसेन हा युपीएससी परीक्षेत अत्यंत कठीण परिस्थितीत उत्तीर्ण होऊन आयपीएस झाला आहे. सय्यद हुसेन या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज व युनियनचे सेक्रेटरी आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी झोपडपट्टीत जाऊन सय्यद हुसेन यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सय्यदचे आजोबा गोदीत डॉक लेबर बोर्डमधील चिपिंग पेंटिंग खात्यामध्ये कामाला होते, तर त्याचे वडील गोदीत ट्रान्सपोर्टमध्ये काम करतात. सय्यद हुसेन यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत यश मिळविले आहे. गोदी कामगारांच्या वतीने सय्यद हुसेन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्याच्या पुढील भविष्यासाठी युनियनच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सत्कारप्रसंगी युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस, अहमद काझी,कार्यकर्ते बाबुराव जाधव,सरगर, थोरात इत्यादी कामगार हजर होते.

आपला

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज