*रजिस्टर सोसायटीच्या इमारतीत म्हाडाची घुसखोरी*


 




 मुंबई - लालबाग मधील गोदरेज कंपाउंड येथील श्री यशोमंगल सहकारी संस्था (जुनी बदानी बोहरी चाळ)यामध्ये म्हाडा प्राधिकरण यांनी बीडीडी (ना.म.जोशी मार्ग) येथील रहिवाशांना पोलीस संरक्षण घेऊन घुसखोरी केली आहे.यापूर्वी त्यांना नायगाव वरळी येथील संक्रमण शिबिर देण्यात आले होते परंतु ते रद्द करून वरील सोसायटीत जबरदस्तीने घुसविण्यात आले आहे.

४० वर्षाच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर ८८ भाडेकरू रहात असलेल्या चाळीचा पुनर्विकास म्हाडाने करून २० मजली इमारत बांधून मजला ७ ते १८ मध्ये पार्ट ओसी घेऊन जुन्या ८८ भाडेकरूंना मार्च २०१८ मध्ये रहावयास दिले.उर्वरित ६८ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात आले.त्याप्रमाणे पार्ट ओसी मधील ४ सदनिकाची जाहीरात काढून विक्री केली आहे.मजला १ ते ६ व १९ ,२० या मजल्याकरिता मेसर्स बी जि शिर्के यांनी ओसी साठी कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे पूर्ण ओसी मिळाली नाही त्यामुळे जाहिरात काढून विक्री झालेली नाही.त्यामुळे म्हाडाला कित्येक करोड रुपयांना मुकावे लागले.दि.१२ एप्रिल २०२३ रोजी म्हाडाने यशोमगल सोसायटीला पत्र पाठवून वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सदर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचा शासनाचा मानस आहे.बदानी बोहरी चाळीचा विकास ३३ (७) अंतर्गत करण्यात आलेला असून ६८ जागा पैकी ६४ जागा रिकाम्या आहेत.त्यासाठी ६४ गाळे वरळी बीडीडी येथी रहिवाश्याना संक्रमण शिबीर म्हणून वितरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.सदर बाब सोसायटीला विश्वासात न घेता घेण्यात आलेला आहे.वास्तविक ३३ (७) अंतर्गत बांधलेली रजिस्टर सोसायटी संक्रमण शिबीराच्या नियमात बसत नाही.तरीही म्हाडाने संक्रमण शिबीराला मान्यता दिली हे सोसायटीच्या रहिवाश्यांना पटलेले नाही.त्यांनी यासंबंधी म्हाडाचे अधिकारी,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार याना पत्र पाठवून विरोध केलेला आहे.जुन्या रहिवाश्यांना फक्त संक्रमण शिबीर करण्यास विरोध आहे म्हाडाने ज्या कारणासाठी ते ६४ गाळे ठेवले आहेत त्यांची पूर्तता करावी किंवा मास्टर लिस्ट मधील रहिवाश्यांना जागा द्यावी जेणेकरून नियमाप्रमाणे आम्हाला त्यांना सभासद करून घेता येईल.सोसायटीने सर्व स्तरावर पत्रव्यवहार करून मदतीची हाक मागितली असताना कोणीही याविषयी मदत करण्यास तयार नाही त्यामुळे रहिवाश्यांना बेमुदत उपोषण करण्यावाचून पर्याय नाही.

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज