रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री.सटवाजी पवार सर जवळगावकर यांनी मदत केली


 


दिंनाक 2-6-2023 रोजी केदारगुडा येथील महानंदा आनंदराव ढोले व पळसा येथील अर्चना गजानन वाघमारे दोन्ही अतिशय परिस्थितीने गरीब व अनाथ मुलींच्या लग्नासाठी कन्यादान म्हणून भांडी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव चे संस्थापक अध्यक्ष श्री.सटवाजी पवार सर जवळगावकर यांनी मदत केली आहे.आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक कार्याची आवड, सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे या विचाराने रयत सेवाभावी प्रतिष्ठान ची स्थापना केली. अनाथ, परिस्थिती ने अतिशय गरीब कुंटूबाला मदत,ही, शैक्षणिक, आरोग्य, निवारा, लग्न या साठी मदत करतात आपले शिक्षकाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी सामाजिक कार्य करीत आहेत.ते विवेकानंद प्राथमिक शाळा हदगाव येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद हदगाव तालुका अध्यक्ष आहेत.

केदारगुडा व पळसा येथील कुटुंबाला मदत देण्यात आली त्या वेळेस राजेश पांडे हदगावकर, प्रभाकर दहिभाते सर बरडशेवाळा, बंडू माटाळकर सर निवघेकर, हरिश्चंद्र चिल्लोरे सर हदगांव, अमोल जाधव पारवेकर,सौ.सविता ताई निमडगे, विनोद निमडगे,दिपक पाटील पळसेकर, गजानन अंनतवार कवानकर, तानाजी गायकवाड केदारगुडा पळसा व केदारगुडा येथे गावातील नागरिक माता भगिनी उपस्थित होते.

यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव च्या स्थापनेपासून 1-जवळगाव 2- वाटेगाव 3- हदगाव 4- तालंग 5- पळसा 6- केदारगुडा येथील कुंटूबाला विवाह साठी तसेच कामारी व तामसा येथील कुटुंबाला शिक्षणासाठी मदत केली आहे त्यांच्या सामाजिक कार्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे .   

भगवानराव कदम वाळकीकर पत्रकार हे पळसा व केदारगुडा येथील मदत देतेवळेस उपस्थित होते

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज