इएसआय' चा लाभ कामगारांना निवृत्ती नंतरही विनाअट मिळावयास हवा! गोविंदराव मोहिते यांची अभिष्टचिंतन सोहळ्यात मागणी!**


      मुंबई दि.१: '‍‌इएसआय'अंतर्गत मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ केवळ नोकरीला असे पर्यंतच नव्हे तर निवृत्तीनंतरही तो कामगारांना विनाअट मिळावयास हवा,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अभिष्टचिंत सोहळ्यला उत्तर देताना केले आहे.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस तसेच अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय संस्थांचे नेतृत्व करीत असलेले कामगार नेते गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसा निमित्ताने गुरुवारी परेलच्या मनोहर फाळके सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.

    संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर संपर्क कार्यक्रमा निमित्ताने मुंबई बाहेर असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला शुभसंदेश पाठवून श्री.मोहिते यांचे अभिष्टचिंतन केले.माजीनगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते प्रारंभी गोविंदराव मोहिते यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.्

   'इएसआय'या सामाजिक सुरक्षितेवर बोलताना गोविंदराव मोहिते पुढे म्हणाले,कामगारांना इतकी चांगली वैद्यकीय सुविधा मिळवून देणारी लाभदायक योजना अन्य कोणतीही नाही.मात्र ही‌ योजना आर्थिक दृष्ट्या सक्षम केली पाहिजे आणि खेड्यापाड्यातील असंघटित वेठबिगारां पर्यंत‌ ही योजना पोहोचालयास हवी‌.तिचे कार्यक्षेत्रही महाराष्ट्रभर खेड्यापाड्यात विस्तारावयास हवे,तरच तिचा हेतू ख-या अर्थाने सफल‌ होईल.कामगारांना काही रक्कम भरून निवृत्ती नंतरही ही योजना चालू ठेवता येते. परंतु त्या साठी अनेक कडक अटी आणि नियम आहेत.तेव्हा निवृत्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना ही इएसआय अंतर्गत वैद्यकीय सुविधा विना आट लागू झाली पाहिजेत.

    केंद्रीय वस्त्रोद्योगाकडे या ना त्या मार्गाने कोट्यावधी रुपयांची धनरांशी गोळा होत असतांनाही एनटीसी गिरण्या पूर्ववत चालविण्यात येत नाहीत किंवा उपासमारीचे‌ जीवन जगणाऱ्या कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासूनचा थकीत पगार देण्यात आलेला नाही,यावर घणाघाती शब्दांत टिका करून गोविंदराव मोहिते म्हणाले,केंद्र सरकार असो किवा राज्य सरकार असो, कामगारांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर  

केवळ वारेमाप घोषणा करून वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहे, अशा सरकार विरूद्ध कामगारांना आता रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडावे लागेल,असा आपल्या भाषणात गोविंदराव मोहिते यांनी इशाराही दिला.

    या प्रसंगी सर्वश्री निवृत्ती देसाई,राजन लाड,जी.बी‌‌.गावडे,आशा आसबे,दादा पवार, उदय पवार, मुकेश तिगोटे, नामदेव झेंडे,महेंद्र सातोसे यांची गोविंदराव मोहिते यांच्या विविध जीवन पैलुंवर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.अण्णा शिर्सेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांचे विशेष सत्काराने अभिष्टचिंतन करण्यात आले.व्यासपीठावर उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, मिलिंद तांबडे,साई निकम,जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजचै प्राचार्य श्री सारंग आदी उपस्थित होते.***

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज