गोदी कामगार पगारवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची मिटिंग 15 जूनला मुंबईत होणार*

भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगार वाढीसाठी २९ मे २०२३ रोजी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड रूममध्ये इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली द्विपक्षीय वेतन समितीची दुसरी मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये बक्षी अहवालाची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. मात्र या अहवालास सर्वच फेडरेशनच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला. पी.एल.आर. बाबत सविस्तर चर्चा होऊन पोर्ट स्तरावर ३ टक्के उत्पादकता वाढीला सर्वच नेत्यांनी विरोध केला आहे. आता द्विपक्षीय वेतन समितीची व पीएलआर संबंधी पुढील मिटिंग 15 जून 2023 रोजी मुंबईत होणार आहे. आजच्या मिटींगला फेडरेशनच्या वतीने सुधाकर अपराज, विद्याधर राणे, असीम सूत्रधार, कृष्णमूर्ती, शर्मा, केरसी पारेख, नरेंद्र राव, मासन, आसवानी, विशाखापटनम पोर्टचे सॅम, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, कल्पना देसाई कामगार नेते उपस्थित होते.

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या