सेलू येथे राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विजयी






सेलू (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने

राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा ,( १७/१९) वर्षाखालील मुले/मुली) गटात

क्रीडा स्पर्धेत दि. ७ मे २०२३ या कालावधीत महेश ॲग्रो , रवळगांव रोड सेलू येथील क्रीडांगण वर अंतिम सामन्यात १९ वर्षे मुले गटात पुणे विभाग वि. नागपूर दरम्यान चुरशीच्या लढतीत (५-२) गोल करून प्रथम : पुणे, व्दितीय: नागपूर, तर तृतीय: छत्रपती संभाजीनगर विजयी ठरले. १९ मुली गटात अंतिम सामन्यात नागपूर वि नाशिक दरम्यान (२-१) गोल करत प्रथम : नागपूर, व्दितीय: नाशिक, तर तृतीय: पुणे विजयी ठरले.

           १७ वर्षे मुले गटात अंतिम सामन्यात पुणे विभाग वि. लातूर दरम्यान (३-२)गोल करत चुरशीच्या लढतीत प्रथम : पुणे, व्दितीय: लातूर, तर तृतीय: कोल्हापूर विजयी ठरले.

      १७ वर्षे मुली गटात अंतिम सामन्यात नागपूर विभाग वि. नाशिक दरम्यान चुरशीच्या लढतीत ( ३-२) गोल करत प्रथम : नागपूर व्दितीय: नाशिक, तर तृतीय: कोल्हापूर विजयी ठरले.


      बक्षीस कार्यक्रम वितरण राज्य फ्लोअरबॉल चिटणीस रवींद्र चोथवे, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, महेश ॲग्रो इंडस्ट्री संचालक विपीन मंञी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलांले, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रम चे सुञ सुञ संचलन जिल्हा योगा सचिव डी. डी.सोन्नेकर, तर आभारप्रदर्शन जिल्हा फ्लोअर सचिव प्रशांत नाईक, यांनी केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी नरेंद्र पवार जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी, फ्लोअरबॉल जिल्हा अध्यक्ष अशोक काकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे,

 जिल्हा सचिव प्रशांत नाईक,भारत घांडगे, अनुराग आमटी,बालाप्रसाद राठोड, सोनू नाईक, कुणाला चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सत्यम बरकुले, यांनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या