पेरणी अगोदर भाऊरावने थकीत रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन*

प्रल्हाद इंगोले यांचा इशारा

🎯 चालू वर्षाची 50 कोटी बाकी

 🎯 विभागात सर्वात कमी उचल

🎯 भाऊराव चे नाव मोठे लक्षण खोटे

 नांदेड : यंदाच्या हंगामातील 50 कोटी रुप अद्याप भाऊराव कारखान्याकडे थकीत आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी थकीत एफ आर पी रक्कम द्यावी अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती दिली.


 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने केंद्राच्या कायद्यात हस्तक्षेप करून एफआरपी तीन टप्प्यात देण्याची भूमिका स्वीकारली होती त्याचे दुष्परिणाम आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. ऊस गेल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम देणे बंधनकारक होते. परंतु ठाकरे सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज गाळप हंगाम बंद होऊन तीन-चार महिने झाले तरीही शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम मिळाली नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने हंगामात केवळ 1885 रुपयाची पहिली उचल दिली. भाऊराव युनिट क्रमांक एक ने 3 लाख 55 हजार 452 मॅट्रिक टनाचे गाळप केले तर युनिट क्रमांक दोन डोंगरकडा दोन लाख 21 हजार 667 मॅट्रिक टनाची गाळप झाले. दोन्ही युनिटचे मिळून भाऊराव कडे पन्नास कोटी बाकी आहेत. नांदेड विभागात पहिली उचल सर्वात कमी देणारा भाऊराव कारखाना एकमेव आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशोकराव चव्हाण यांच्या नावाखाली सातत्याने शेतकऱ्यांना कमी दर देण्याची भूमिका भाऊराव कारखान्याने घेतली आहे. शेतकऱ्यांना उसाचा दर योग्य देण्यासाठी अशोकराव चव्हाण यांची कधीच सकारात्मक भूमिका दिसून आली नाही. भाऊराव कारखाना व अशोकराव चव्हाण यांचे नाव मोठे लक्षण खोटे असाच अनुभव शेतकऱ्यांना आतापर्यंत आल्याचा संताप शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केला. कारखाना प्रशासनाने पेरणीपूर्वी यंदाची थकीत बाकी द्यावी अन्यथा सर्वपक्षीय बैठक घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिक शेतकरी नेते तथा ऊर्जा नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.प्रति,

संपादक/ जिल्हा प्रतिनिधी वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रकाशित करावी ही विनंती.


 आपला

प्रल्हाद इंगोले

टिप्पण्या