शांत,सय्यमी अभ्यासु व्यक्तीमत्व उपाधिक्षक वाखारे यांची बदली


प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली

प्रत्येक विभागात प्रशासकिय अधिकारी मग आयएएस असो की आयपिएस, किंवा राज्यसेवेतुन अधिकारी झालेला असो, तो आपल्या कामातुन संबंधीत विभागात आपली छाप सोडत असतो. मग कुणी पारदर्शक कारभारातुन तर कुणी आपल्या कडक स्वभावातुन आठवण सोडून जातो. याचेच एक उदाहरण म्हणजे आपले हिंगोली जिल्हा पोलिस दलाचे पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे होय. आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंतच्या कामगिरीतुन हिंगोलीकरांची मने जिंकली.हिंगोली जिल्ह्यात दाखल होऊन पोलिस उपाधिक्षक ग्रामीण पदाचा पदभार घेतल्यानंतर निवेदन, तक्रार मांडण्यासाठी आलेले प्रत्येक सर्वसामान्यांची त्यांनी दखल घेऊन जातीने लक्ष देऊन ती तातडीने सोडवली. प्रत्येकांच्या तक्रारी अडीअडचणी सोडवणारे अधिकारी म्हणुन त्यांची जिल्हा भरात ओळख निर्माण झाली आहे. पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी हिंगोली ग्रामीण उपविभागाचा पदभार घेतला तेंव्हा पासुन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठे प्रयत्न केले. यामध्ये खंडाळा येथील दोन समाजांतील वाद सामंजस्याने मिटवला. तसेच पारोळा,हिंगणी आंबेडकर जयंती,हिवरखेडा समाज मंदिर, ताकतोडा शेतकरी आंदोलन ही प्रकरणे व्यवस्थीतरीत्या हाताळून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्हे, खुन,दरोड्या सारखे गुन्हे उघड झाली. गोरेगाव खुन प्रकरणात एका आरोपीस जन्म ठेपेची शिक्षा झाली. विवेकानंद वाखारे यांनी तब्बल सात महिने ग्रामीण व शहर उपविभाग चा पदभार व्यवस्थीत सांभाळला तर चार महिन्या पासुन जिल्ह्यातील तीन उपविभाग हिंगोली ग्रामीण, शहर, वसमत उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. हे हिंगोली च्या ईतीहासात पहिल्यांदा पहावयास मिळाले. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यावर ही मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या.गंभीर गुन्हयातील आरोपींना वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसात बेड्या ठोकण्यात आल्या.अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास साहेबांच्या काळात लागला. यामध्ये त्यांना ईतर कर्तबगार ठाणेदारांचेही सहकार्य लाभले. 

वाखारे यांच्या कार्यकाळात गणेशोत्सव, दुर्गाउत्सव विविध धर्मीयांचे सण उत्सव शांततेत साजरे झाले. पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांनी आपल्या पारदर्शक कारभारातुन प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या ईतर अधिकार्यांसमोर आनोखा आदर्श ठेवला. पंचावन्न वर्ष वय असुन सुद्धा तरूण अधिकारी यांना लाजवेल अशी स्फुर्ती त्यांच्यात आजही कायम आहे.आज त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांची नगर जिल्ह्यात बदली झाली. बदली निमित्ताने आदर्श व्यकतीमत्व आसणारे वाखारे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व त्याना नेहमी निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या हातुन गोरगरीबांना न्याय मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

टिप्पण्या