चाकुर येथे राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन*




*शालेय जीवनात शिक्षणा सोबत खेळास महत्व द्यावे आ.बाबासाहेब पाटील* 

लातूर (. . ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २६ मे रोजी भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर येथे उद्घाटन प्रसंगी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले शालेय जीवनात शिक्षणासोबत शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कबड्डी,खो-खो, कुस्ती या खेळाबरोबर टेनिसव्हॉलीबॉल या खेळांचे महत्व वाढले आहे. या खेळांची संकल्पना गेल्या २५ वर्षे पूर्वी माझ्या चाकूर मतदारसंघ तील डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी अथक प्रयत्न करून या खेळास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरा पर्यत आणाला यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या खेळास महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेसाठी आदरणीय नेते अजितदादा पवार यांच्या सहकार्याने प्रयत्न करु असेही प्रतिपादन केले. 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.पी. डी. कदम ( सचिव: लोकायत शिक्षण संस्था अहमदपूर) उद्घाटक :-.आ. बाबासाहेब पाटील (अहमदपूर / चाकुर विधानसभा मतदारसंघ) प्रमुख अतिथी :-माजी राज्य मंञी बाळासाहेब जाधव, मा. डॉ. व्यंकटेश वांगवाड (टेनिस व्हॉलीबॉल जनक) मा. जगन्नाथ लकडे ( जिल्हा क्रीडाधिकारी, लातूर) मा. प्राचार्य डॉ.एस.आर . धोंडगे ( भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकुर) मा. गणेश माळवे (राज्य सचिव टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन)मा. युनूस मासुलदार (चेअरमन चाकुर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर ) मा. विनायकराव बडे (माजी शासकीय अधिकारी) तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

  राज्य स्पर्धेचे प्रास्ताविक राज्य सचिव गणेश माळवे, तर सुञ संचलन: प्रा. डी.एन.हेमनर, तर आभारप्रदर्शन यांनी सतिश नावाडे मानले. 

       राज्यतील अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई आठ विभागतील स्पर्धेत १४/१७/१९/ वयोगटातील मुले व मुली ३० संघातील खेळाडू ,व्यवस्थापक पंच एकुण २५० सहभागी झाले आहेत.

विभागीय सचिव रामेश्वर कोरडे,शेख खमर, प्रशांत तिरुके, पंच प्रमुख सतिश नावाडे , संतोष शिंदे , निलेश माळवे, राहुल पेटकर, किरण घोलप, विजय बोडके, सोमनाथ पोपळे, यांनी पंचांची कामगिरी पार पाडली.

जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे व प्रार्चय एस.आर. धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नामदेव गौड, नवनाथ जातीने, मोहनराव साळुंके, आकाश पाडुळे, बालाजी सूर्यवंशी, स्वामी माधव, अश्फाक शेख, दत्ता कोकरे, एकनाथ भोसरे, सिध्देश्वर स्वामी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पण्या