अहिल्या होळकर यांचा आदर्श जनमानसात रुजवणे काळाची गरज! रामिम संघ ग्रंथालय-वाचनयाची आदरांजली!*



      

      ‌मुंबई दि.३१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सेवाभावी व्रत अंगीकारुन जनमानसात आदर्श निर्माण केला, तो पुढे नेणे काळाची गरज आहे,अशी भावपूर्ण आदरांजली राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांना वाहण्यात आली आहे.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या

वतीने शूरवीरांगणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 

आज वाचनालयात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे

खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेचे महासंचालक विलास डांगे, सेक्रेटरी साई निकम,सहाय्य सेक्रेटरी मोहन पोळ आदी त्यावेळी उपस्थित होते.

   सर्वश्री निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण यांनी आपल्या भाषणात अहिल्याबाई होळकर यांची महती विषद करताना सांगितले,त्या 

शुर-पराक्रमी होत्या,एवढेच नव्हे तर त्या दानशूर वीरांगनाही होत्या.म्हणूनच त्यांचे कार्य प्रेरणा दायक ठरते.        

   ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल ममता घाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या