*अप्पापाडा आगीत बेघर झालेल्या तुकाराम शिंदेला आर्थिक मदत!*

 


   मुंबई दि.१४: मालाड,आप्पापाडा झोपडपट्टी आगीत‌ भस्मसात झालेल्या बेघर झोपडीवाशी तुकाराम शिंदे याला आज राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक सहकारी संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते ३० हजार रुपयाचा धनादेश देऊन सहानुभूती व्यक्त करण्यात आली.त्यावेळी खजिनदार बजरंग चव्हाण, संचालक बळीराम महाडिक, महाव्यवस्थापक विलास डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

   आठच दिवसांपूर्वी मलाड पूर्व येथील आप्पापाडा झोपडपट्टीला आग लागून जवळपास ११४० झोपड्या भस्मसात झाल्या.त्यामधील तुकाराम शिंदे,राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाच्या गोकुळधाम येथील दुकानात डिलिव्हरीमन म्हणून काम करतात. सरकार कडून अपघात ग्रस्तांना अवघ्या पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.या आगीत शिंदे यांची भांडीकुंडी, कपडालत्ता, किडूक-मिडूक सारेच भस्मसात झाले आहे.नेस्त्या कपड्यावर ते आणि त्यांचे कुटुंबीय कसेतरी जगत आहेत.त्यांना रहात्या जागी झोपड्या उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.पण त्यांनी तुटपुंज्या मदतीवर कसे जगायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.तरी त्यांना आर्थिक मदतीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.***काशिनाथ माटल,प्रसिद्धी प्रमुख

टिप्पण्या