कामगार संघटनांनी एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज*



केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण व चार लेबर कोडचे विधेयक मंजूर केल्यामुळे मालक सुरक्षित तर कामगार असुरक्षित झाला आहे. शेतकरी, कष्टकरी कामगार व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी कामगार चळवळ आता राजकीय चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व कामगार संघटनानी मतभेद विसरून एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. असे स्पष्ट प्रतिपादन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेत्यांनी आज एक मे कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या सभागृहात जाहीरपणे काढले. 

 कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज एक मे कामगार दिनानिमित्त सर्व केंद्रीय कामगार संघटनाच्या वतीने परेल रेल्वे स्टेशन पूर्व ते राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या कार्यालयापर्यंत कामगारांनी भव्य मोर्चा काढला. मोदी हटाव देश बचाव, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी, जनता विरोधी सरकारचा निषेध असो. कामगार एकजुटीचा विजय असो. हम सब एक है. अशा प्रकारच्या विविध घोषणा देत मोर्चा निघाला. या मोर्चाचे सभेत रूपांतर राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या सभागृहात झाले. या ठिकाणी झालेल्या सभेत कामगार नेत्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन, कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्रीय कामगार संघटनांनी वर्षभर आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. तीन महिन्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध प्रचंड मोर्चा काढला जाईल. शेतकऱ्यांनी एक वर्ष संघर्ष करून केंद्र सरकारला कायदे मागे घेण्यास भाग पाडले. कामगारांनी देखील अशा प्रकारे एकजुटीने लढा दिला पाहिजे.असंघटित कामगारांना संघटित केल्याशिवाय कामगारांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी संघटित क्षेत्रातील सर्वच कामगार नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची काळाची गरज आहे. कामगार संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. तळागाळात सर्व सामान्य शेतकरी व कामगारापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे. येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झोपडपट्टी गल्लीबोळात जाऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध प्रचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारची वक्तव्य सर्वच कामगार नेत्यांनी केली.

 याप्रसंगी महाराष्ट्र हिंदू मजदूर सभेचे अध्यक्ष शंकर साळवी, जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, खजिनदार निवृत्ती धुमाळ, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, समन्वय समितीचे निमंत्रक कॉ. एम. ए. पाटील, इंटकचे गोविंदराव मोहिते, दिवाकर दळवी, सिटूचे कॉ.विवेक मॉन्टेरो, शहीद अहमद, एआयसीसीचे विजय कुलकर्णी, आयटकचे कॉ. उदय चौधरी आदी मान्यवर कामगार नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या सभेच्या आयोजनामध्ये राष्ट्रीय मिल मजदुर संघाचा सहभाग होता.

आपला

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या
Popular posts
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
कामगार संघटनेच्या कार्यात कामगार कार्यकर्ते महत्त्वाचे- एस. के. शेट्ये*
इमेज
कालच्या इंटक कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार!*
इमेज