आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय*


आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा बिनविरोध जिंकल्या तर उर्वरित १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनलला १४ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम विजयी झाले.

पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात मंचर येथे २९ एप्रिल २०२३ रोजी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३- २०२८ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 

 धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला आहे, असे स्पष्ट मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. देवदत्त निकम यांनी मांडले.

मंचर येथे निवडणूक निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवदत्त निकम बोलत होते. ते म्हणाले, मी गेल्या 33 वर्षापासून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. मला लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष, मंचर बाजार समिती सभापती, या पदावर काम करण्याची संधी दिली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम केले. मंचर बाजार समिती डिजिटल केली. शेतकऱ्यांना ४० रुपयात जेवण उपक्रम सुरू केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नेत्यांना माझी अडचण वाटू लागली. त्यांनी मला त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि माझी उमेदवारी नाकारली. पण मला शेतकऱ्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे मी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी कार्यकर्तेनी आम्हाला उघडपणे पाठिंबा दिला. तसेच शिवसेना,भाजप यांनी मला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या सर्वांचा मी आभारी आहे. बाजार समिती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्थकरण करण्यात आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले असले तरी मंचरमध्ये मात्र फक्त देवदत्त निकम यांच्या विजयाचा जयघोष होत असताना पाहायला मिळाला. तर विजय मिरवणूक देखील देवदत्त निकम यांचीच निघाली. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी देवदत्त निकम यांच्या नावाने विजयाच्या घोषणा देऊन गुलाल व भंडारा उधळत होते.

आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटामध्ये सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, वसंत भालेराव, गणेश वायाळ व देवदत्त निकम, महिला प्रतिनिधी रत्ना गाडे, मयुरी भोर इतर मागास प्रवर्ग जयसिंग थोरात, अनुसूचित जाती जमाती सखाराम गभाले ग्रामपंचायत मतदान संघ निलेश थोरात, सोमनाथ काळे, अनुसूचित जाती जमाती संदीप चपटे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल अरुण बांगर तर लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी व सुनील खानदेशे हे बिनविरोध विजयी झाले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या