१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ राहुल, RJ गौती, RJ सौरभ, RJ भूषण, RJ निमी सुद्धा दिसणार आहेत.
हा व्हिडीओ १ मे रोजी मिरची च्या 'mirchimarathi' या youtube चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं पुनर्निर्माण 'मिरची' ने केलं असून, संगीत यश पहाडे यांनी दिलं आहे आणि RJ निधी, कौस्तुभ नाईक आणि यश पहाडे यांनी गायलं आहे. या सर्वांना, मिरचीच्या कंटेंट हेड स्मिता रणदिवे आणि मिर्ची लव चे प्रोग्रामिंग हेड मंदार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
हा व्हिडीओ Natives Communication ने तयार केलाय.
या राज्यगीताचे मूळ गायक शाहीर साबळे हे आहेत. राजा बढे यांचे शब्द आणि श्रीनिवास खळेयांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. या दिग्गजांना मिरचीने त्रिवार मुजरा करत आदरांजली वाहिली असून नव्या ढंगातील 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा हा व्हिडीओ रसिकांनी नक्की पहावा.
नव्या ढंगातील 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा हा व्हिडीओ पहाण्यासाठी लिंक.
https://youtu.be/Q3bAV2mbq3c
https://fb.watch/kfbqC6eC0j/?mibextid=qC1gEa
https://www.instagram.com/reel/CrsS1dapRam/?igshid=YmMyMTA2M2Y=
*जनसंपर्क* : राम कोंडीलकर, राम पब्लिसिटी, मुंबई
संपर्क : ९८२१४९८६५८,
इमेल : ramkondilkar.pr@gmail.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा