खा. हेमंत पाटील यांनी केली माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी.




     राम दातीर 

 माहूर(प्रतिनिधी )माहूर तालुक्यात गेल्या दोन-तिन दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला अवकाळी पाऊस व गारपिटीने तीळ,उन्हाळी ज्वारी,मका यासह इतर उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागातील टीन पत्राच्या घरांचे मोठे नुकसान झाले तसेच अनेक जनावरे जखमी झाले आहेत.मंगळवार,बुधवार, व गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस,गारपीट व विजेच्या कडकडाटामुळे नागरिक भयभीत झाले होते, मध्यरात्री जोरदार पाऊस व गारपिटीने तांडव घातले असून यामध्ये विद्युत पुरवठा हि बंद पडले होते.

 दि.२७ एप्रील रोजी गुरुवारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. हेमंत पाटील यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले,तहसीलदार किशोर यादव, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी ,ग्रामसेवक व तलाठी यांच्या समेवत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या रुई,सातघरी, लांजी गावास भेट देऊन रत्यालगत असलेल्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. शेतकऱ्यास व नागरिकांना धीर दिला व शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.यावेळी नागरिक शेतकरी उपस्थित होते. 

चौकट...

*खा.हेमंत पाटील यांचा माहुर पाहणी दौरा अर्धवट*.!


हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. हेमंत पाटील यांचा माहुर तालुका गारपीटीने नुकसान झालेला पाहणी दौरा अर्धवट.मौजे ईवळेश्वर परिसराची पाहणी करण्यासाठी विनंती करून सुद्धा खा.हेमंत पाटलांनी ईवळेश्वर व परिसरातील शेतकऱ्यांची घोर निराशा केली व या परिसरातील शेती पाहणी करण्यासाठी पाठ फिरविली.सदरील ईवळेश्वर भाग हा हिंगोली लोकसभा मतदारसंघात येते त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी अशी विनंती इवळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जून जाधव यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.

टिप्पण्या