राम दातीर माहूर(प्रतिनिधी )प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर वसमतकर, बरबडेकर मठाधिपती आनंद दत्तधाम आश्रम माहूर यांच्या संकल्पनेतून आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ माहूर येथे दि.०९/०५/२०२३ ते १०/०५/२०२३ या कालावधित दत्ता महाराज शिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले असून परिषदमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आहे.दिं.९मे रोजी शिक्षण परिषदचे उद् घाटन नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व राडा सिनेमाचे निर्माते रामशेट्टी तूप्तेवार यांचे हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाची सांगता दिं १०मे रोजी सुरज ग्रुपचे चेअरमन तथा उद्योजक रमेशशेठ पारसेवार यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेत छत्रपती संभाजीनगर,नांदेड,परभणी, लातूर व यवतमाळ येथील अनुभवी व नामांकित शिक्षणतज्ञ, गुरुजन, प्राचार्य यांच्याकडून विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन तसेच UPSC, MPSC परीक्षाबाबत सखोलअसे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याच कार्यक्रमात ज्यांनी संघर्षमय प्रवास करून यश संपादन केले अशा यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा आश्रमाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षण परिषद काळात मुक्कामाची व जेवण व नास्त्याची व्यवस्था आश्रमातर्फे विनामुल्य करण्यात आली आहे. जास्तीत विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी ८ व ९ मे ला मुक्कामी येवुन शिक्षण परिषदेचा लाभ घ्यावा असे आव्हान द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर, वसमतकर यांनी केले आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा