महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्यावतीने १६वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट (सीनियर) नेटबॉल क्रीडा स्पर्धा महिला व पुरुष दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2023 यादरम्यान नानासाहेब महाडिक कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पेठ नाका ता.वाळवा जि.सांगली. या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून या संघ निवडीसाठी परभणी जिल्हा सीनियर नेटबॉल निवड चाचणी महिला व पूरूष परभणी सिटी क्लब परभणी येथील नेटबॉल मैदानावर दिनांक 9 एप्रिल वार रविवार सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आली आहे निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी येताना सोबत आधार कार्ड (सत्यप्रत) दहावी सनद (सत्यप्रत) दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित रहावे.
या निवड चाचणीसाठी निवड समिती चेअरमन महेशकुमार काळदाते,मनीष जाधव,विश्वास पाटील हे काम पाहतील या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव मा. कैलास माने,माणिक कदम,राजेश शहाणे, प्राचार्य सुरेश नाईकवाडे,विनोद गणाचार्य यांनी केले आहे

COMMENTS