उदगीर : कै.त्र्यंबकअप्पा माळेवाडे प्रतिष्ठान, उदगीर चा राज्यस्तरीय "समाज रत्न" पुरस्कार गंगाधर डिगोळे यांना प्रदान करण्यात आला. रविवार,30 मार्च 2023 रोजी उदगीर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री श्री 10 डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू, माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे, माजी आमदार मनोहर पटवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, सेवालाल तरी बापटले, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंग घोणे इत्यादीच्या उपस्थितीत डिगोळे यांना "समाज रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गंगाधर डिगोळे हे मूळचे हिसामनगर (माटेगडी), तालुका देवणी येथील रहिवाशी असून हल्ली लातूर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक या पदावरून सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात, 2010 पासून एकलव्य संसार केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना अल्प दरात निवासी शैक्षणिक सुविधा पुरवणे, पुरुष हक्क संरक्षण समितीच्या जिल्हा सचिव पदावरून पुरुषांच्या हक्कांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे इत्यादी कार्याची दखल घेत प्रतिष्ठानने त्यांची "समाज रत्न" पुरस्कारासाठी निवड केली होती.
या पुरस्काराबद्दल गंगाधर डिगोळे यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गुरुबस्त त्र्यंबकआप्पा माळेवाडे, उपाध्यक्ष संजय राजुळे, सचिव वीरभद्र तरगुडे, कोषाध्यक्ष माधव तरगुडे, प्रतिष्ठानचे सदस्य व निवड समितीचे आभार मानले आहेत.

COMMENTS