कामगार कायद्यावर चर्चा करण्यासाठी १९ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना.श्री. सुरेश खाडे याच्याबरोबर सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांची सह्याद्री गेस्ट हाऊस येथे बैठक झाली.
या बैठकीस हिंद मजदूर सभेतर्फे ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के.शेट्ये, सरचिटणीस संजय वढावकर, कार्याध्यक्ष सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष किशोर कोतवाल, सरचिटणीस केरशी पारेख, सचिव निवृत्ती धुमाळ, वेकंटेश स्वामी, मुन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर इत्यादी नेते उपस्थित होते. कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, असंघटित कामगार यांची प्रभावीपणे बाजू ॲड. एस. के. शेट्येसाहेब यांनी मांडली, तर मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न साथी अशोक जाधव यांनी मांडला. किमान वेतन चार कोड बिल आणि कंत्राटी कामगारांच्या विषयावर साथी संजय वढावकर यांनी आपले विचार मांडले. तर साथी निवृत्ती धुमाळ यांनी नुकतेच विधानसभेमध्ये पारित झालेले विधेयक क्रमांक 33 यावर भाष्य करून कामगार आयुक्त कार्यालय आणि माथाडी मंडळाचे रिक्त पदे तातडीने भरण्याची विनंती मंत्री महोदयांना केली. मंत्री महोदयांनी कामगारांच्या मागण्यांची नोंद घेऊन यापुढे सातत्याने मिटिंग घेण्याचे मान्य केले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS