*सेलू च्या क्रीडा व शैक्षणिक परंपरा आदर्श - संजय मुंडे*
*क्रीडा प्रशिक्षण शिबीरात ७५ खेळाडूंचा सहभाग*
(सेलू) खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आजच्या आधुनिक काळात आपल्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी व निरोगी जीवनासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मैदानावरील खेळ खेळावे असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी केले.
येथील नूतन विद्यालयात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना गुरूवार ता. २० एप्रिल रोजी ते बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री संजय मुंडे, क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम, तालुका क्रीडा अधिकारी महेश खर्डेकर, उप मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर, डी डी.सोन्नेकर , रोहीदास मोगल,गिरीश लोडाया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी "भारत श्री राष्ट्रीय क्रीडा रत्न " पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा नागेश कान्हेकर तसेच,बाल योगपटूंनी योगासनाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून पाहुण्यांची मने जिंकली. पदक प्राप्त खेळाडू कुणाला चव्हाण, चि.शौर्य फटाले, कु. आद्या खजीने,काव्या राजवाडकर, मनस्वी महाजन, सोहम मगर, सुष्टी सोळंके, देवांश टेळकीकर, सुष्टी कुंभार, अपुर्वा घुमरे, साक्षी अर्जुने, सोमनाथ महाजन, शिल्पा पिपंळे , ऋतुजा देशमुख, या खेळाडूंचा ही पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.डी सोन्नेकर, सुत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे तर सतीश नावाडे यांनी आभार मानले.
या प्रशिक्षण शिबीरात योगासने,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेनिसव्हॉलीबॉल, टेबल टेनिस,हॉकी, सेपक टकारा अशा विविध प्रकारच्या खेळांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन, दि. १३ ते २५ एप्रिल दरम्यान खेळांचा सराव सकाळी ६ ते ८ व दुपारी ५ :३० ते ७ अशा दोन सत्रात केले जात आहे. तसेच शिबीरात सहभागी झालेल्या
सर्व विद्यार्थ्यांना दररोज पोषक -आहार व फळांचे वाटप करण्यात येत आहे. या शिबीरात ७५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीष लोडाया, नरेंद्र झाल्टे, सुभाष मोहकरे, अनुजा सुभेदार,शिला बरडे, अरुण रामपूरकर, केशव डहाळे
चौकटीचा मजकूर
सेलू ला आदर्श क्रीडा परंपरा -संजय मुंडे
सेलू तालुका हा गुणवान खेळाडू व गुणवान माणसांची खाण आहे, महाराष्ट्राला विवीध खेळातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सेलू तालुक्याने दिले आहेत. क्रीडा व शिक्षणा बरोबरच सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात अनेक आदर्श परंपरा सेलू त अनुभवण्यास मिळतात असे गौरवोद्गार राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री संजय मुंडे यांनी काढले.
,


COMMENTS