राम दातीर
माहूर (प्रतिनिधी) माहुर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या (MREGS) अंतर्गत पुर्ण झालेल्या कामाची रक्कम लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा अशी मागणी गट विकास अधिकारी माहुर यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष शिवचरण राठोड यांनी केली आहे.
माहुर तालुक्यातील शेतकरी नापिकी, अतिव्रुष्टीने वैफल्यग्रस्त झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत आहे. पंचायत समितीमार्फत रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे, सिंचन विहीर, जनावरांचा गोठा ईत्यादी कामे मंजुर झाली असून त्यापैकी बहुतांश कामे पूर्णही झाली असून आज तारखेपर्यंत लाभार्थी शेतकर्यांना देयकाची रक्कम मिळाली नसल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सदरील शेतकर्यांच्या कामाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवचरण राठोड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहुर यांचेकडे निवेदनाद्वारे केली असून शेतकऱ्यांची देयके तात्काळ जमा करण्यात आले नाही तर फुलंब्री व संभाजीनगर येथे झालेल्या आंदोलना प्रमाणे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष शिवचरण राठोड यांनी दिला आहे.

COMMENTS