मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
कै.शंकरराव खाकीबा डोनगावे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.३१ मार्च रोजी आयोजित नेत्र निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल १९५ जनांची तपासणी व १२ जनांची मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील मौजे मुगाव येथील सामाजिक कार्यकर्ते माधवराव डोनगावे हे सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन नेहमी चर्चेत असतात. दि.३१ मार्च रोजी त्यांचे वडील कै.शंकरराव खाकीबा डोनगावे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मौजे मुगाव येथे मोफत नेत्र निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात त्यांनी समता फाऊंडेशन,मुंबई व लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी,नांदेड यांच्या सहकार्याने गावातील तब्बल १९५ जनांची तपासणी करून १२ मोतीबिंदू रुग्णांनावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले.या दरम्यान मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा रुग्णांना मोफत काळे चष्मे वाटप करण्यात आले.
नायगाव विधानसभा मतदारसंघातील युवा नेतृत्व प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांचे विश्वासू म्हणून माधवराव डोनगावे हे परिचित आहेत. प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांच्या सामाजिक उपक्रमांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून माधवराव डोनगावे हे आपल्या परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.त्याच अनुषंगाने माधवराव डोनगावे यांनी आपले वडील कै.शंकरराव खाकीबा डोनगावे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मौजे मुगाव येथे मोफत नेत्र निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.या शिबिरात तब्बल १९५ जनांची तपासणी करून १२ मोतीबिंदू रुग्णांनावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमांच्या परिसरात कौतुक होत आहे. यावेळी या शिबिराला यशस्वी करण्यासाठी डोणगावे व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS