ऊर्स निमित्त जंगी कव्वालीच्या मुकाबल्यासह कुस्त्यांचा फड रंगणार
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील मौजे धामणगाव येथे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारे सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स सालाबादप्रमाणे दि.६ एप्रिल गुरुवार रोजी संपन्न होणार असून या ऊर्स निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स प्रतिवर्षाप्रमाणे ऊर्सकमिटी व अहैले सुन्नतुल जमात धामणगाव यांच्या वतीने दि.६ एप्रिल गुरुवार रोजी रात्री १०:३० वा.माली पटेल यांच्या वाड्यातून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताश्यांच्या गजरात संदल ची भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा ऊर्स जल्लोषात साजरा करतात.या ऊर्सनिमित्त हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन बघायला मिळते.या ऊर्सचे विशेष महत्त्व असे की, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार बेटमोगरा येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले श्री.शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू डॉ.सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या हस्ते सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्सनिमित्त संदल व चादर चढवण्याच्या मान कायम आहे.
या ऊर्सला महाराष्ट्रासह तेलंगणा,आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील विविध भागातून विविध जातीधर्माचे लोक हजारोंच्या संख्येने सय्यद बाबुपिर यांच्या दर्शनासाठी येतात. या उत्सवाला दोन दिवस आगोदर पासूनच असंख्य लोक सय्यद बाबुपिर यांच्या दर्गा परिसरात दाखल झाले आहे. यासोबत दर्गा कमिटीच्या वतीने गावातील रसत्यांवर व दर्गा परिसरात केलेल्या रंगबिरंगी रोषणाईच्या अतिशय सुंदर व मनमोहक नजारा पाहायला मिळत आहे.
यादरम्यान ऊर्स यात्रेनिमित्त दर्गा कमिटीच्या व समस्त गावकऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यात दि.७ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी ३ वा.कुस्त्यांच्या फड रंगणार असून रात्री ८ वाजता नागपूरचे इंटरनॅशनल आर्टिस्ट टी.व्ही.सिंगर कव्वाल फैजान ताज व फनकारा सिबा परवीन कानपूरी रेडिओ व टी.व्ही सिंगर यु.पी यांच्या कव्वालीच्या जंगी मुकाबला होणार आहे.तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी सय्यद बाबुपिर यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजित विविध कार्यक्रमांच्या लाभ घ्यावा असे आवाहन धामणगाव येथील दर्गा कमिटीच्या वतीने करण्यात आले.

COMMENTS