राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पंधराव्या वित्त आयोगातून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. दि.31मार्च रोजी दु.2 वा.चे सुमारास वावटळ आल्याने दुसऱ्या मजल्यावरील टिन पत्राचे छत लोखंडी एंगलसह उडून किनवटकडे जाणाऱ्या महामार्गा जवळील विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रा जवळ पडले.त्यावेळी कामावरील एका मजुराच्या बरगडीत वीट लागल्याने त्याला जबर मुका मार लागला आहे.सदर घटनेने मात्र प्रशासकीय कालावधीत होणाऱ्या कामाचे वास्तव जगासमोर आले आहे.
दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्लॅब तर दुसऱ्या मजल्यावर टिन पत्राचे छत टाकण्यात आले.दि.३१ मार्च रोजी दु.2 वा.चे सुमारास वावटळ आल्याने टिनशेड उडून महामार्गावर पडले.त्यावेळी कामावरील मजूर मात्र चांगलेच धस्तावले होते. *पंधराव्या वित्त आयोगातून सदरचे काम होत आहे, त्यावर 39 लक्ष रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. सदरची घटना नैसर्गिक असून टिनछताचे काम करणाऱ्या मजुराकडून ती चूक झाली, नोंदणीकृत मजुरालाच विम्याचे कवच असते* शाखा अभियंता निराकार खानसोळे


COMMENTS