नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे.अशोक चव्हाण यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम; भाजपचा सुफडा साफ
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे.नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण पाच बाजार समित्यांचा निकाल लागला आहे.
शनिवारी जिल्ह्यातील चार बाजार समित्यांचा निकाल घोषित करण्यात आला.तर आज नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला. या पाच ही बाजार समिती वर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
बाजार समितीच्या या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा बाजार समिती मध्ये एन्ट्री करते की काय.अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 18 जागे साठी ही निवडणुक अटीतटीची झाली.दरम्यान 18 पैकी 1 जागा महाविकास आघाडीने बिनविरोध काढली.17 जागे साठी मतदान झाले.आज 17 जागेचे निकाल लागले असून 17 पैकी 16 जागांवर महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.
एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 18 पैकी 17 जागेवर विजयी मिळविल्या नंतर महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील बाजार समित्यां आपल्या ताब्यात ठेऊन भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धूळ चारली आहे.
बाजार समितीचे हे निकाल येणाऱ्या काळात राजकीय दिशा दाखवणारे निकाल आहेत. लोकांचा महाविकास आघाडीवर प्रचंड विश्वास असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या निकालानंतर वेक्त केले.

जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य - प्रताप पाटील चिखलीकर
जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी जो कल दिला आहे ते आम्ही मान्य करतो.परंतु या बाजार समित्यांमध्ये भाजपाने केव्हा नव्हे ते एंट्री केली आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.भाजपाचे अनेक उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून भाजपा हा पक्ष जनतेचे कामे करणारा पक्ष आहे .सातत्याने या पुढे देखील आम्ही जनतेचे कामे करू अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली
addComments
टिप्पणी पोस्ट करा