देवनी प्रतिनिधि: -उन्हाचा पारा चढत असून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील शेतकरी निवृत्ती देवराव गायकव...
देवनी प्रतिनिधि:
-उन्हाचा पारा चढत असून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील शेतकरी निवृत्ती देवराव गायकवाड यांचा दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतकरी निवृत्ती देवराव गायकवाड हे 18 एप्रिल रोजी सकाळी शेतातील कडबा गोळा करण्यासाठी व गाजर गवत कापण्यासाठी शेताकडे गेले होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे ते झाडाखाली बसून पाणी पिले. काही वेळाने उलट्या झाल्या.तो त्रास सहन करत ते घराची ओढ धरून घराकडे निघाले व घरी पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. एकंदरीत त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे गायकवाड परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

COMMENTS