महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन व सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2023 या दरम्यान नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी राज्यस्तरीय सीनियर नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये परभणी जिल्ह्याचा पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय सीनियर नेटबॉल स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.
परभणी जिल्ह्याच्या पुरुष संघामध्ये गणेश दराडे (कर्णधार) ऋषिकेश काळे (उपकर्णधार) गणेश सौदागर,देवानंद गुहाडे,अनिल डवरे,रुखमाजी काळे,कोंडीबा काळे, शिवप्रसाद घुकसे,स्वप्निल मोरे,वैभव ताटे,अक्षय साळवे,सुनील सावंत या खेळाडूंने परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले या विजयी संघाला प्रशिक्षक:- महेशकुमार काळदाते व्यवस्थापक:- कैलास माने यांचे मार्गदर्शन लाभले...
विजयी खेळाडूंना मान्यवर मा.राहुल दादा महाडीक, महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशन सहसचिव मा.श्याम देशमुख,सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव एस.एल.पाटील,पंच प्रमुख नितीन जाधव,महाजन सर,सुशांन सूर्यवंशी, व इतर मान्यवर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
*या विजयी खेळाडूंना महाराष्ट्र अम्युचर नेटबॉल असोसिएशनचे महासचिव मा.ललित जीवनी,अध्यक्ष मा.विपिनभाई कामगार,कोषाध्यक्ष मा.एस.एन मूर्ती,सहसचिव मा.श्याम देशमुख,परभणी जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव मा.कैलास माने,प्राचार्य सुरेश नाईकवाडे,माणिक कदम प्रा.विनोद गणाचार्य,विश्वास पाटील,मनिष जाधव यांच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले....*🥉🏐🏆🏐🥉

COMMENTS