मुंबई दि.१८:राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संघटन सेक्रेटरी विठ्ठल ताम्हणकर यांचे आज ह्रुदयविकाराने दुःखद निधन झाले ( ७१).आयुष्य भर संघटनेच्या कामात झोकून देऊन काम करणारे निष्ठावंत विठ्ठल ताम्हणकर यांच्या आकस्मित निधनाने संघटनेत कायम पोकळी जाणवत राहील,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
विठ्ठल ताम्हणकर यांच्या पाश्च्यात पत्नी,दोन मुलगे, स्नुषा,नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.बंद इंदू मिल क्रमांक १ मध्ये काम करणारे गिरणी कामगार विठ्ठल ताम्हणकर यांचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या अनेक लढ्यात,आंदोलनात महत्त्वाचे योगदान राहिले आहे.युनियनमध्ये जवळपास तीस वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणारे ताम्हणकर सदशिल,तडफदार आणि हरहुन्नरी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण गिरणगावात सूपरिचित होते.लालबाग मध्ये रहाणारे विठ्ठल ताम्हणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होताना दिसतो.त्यांच्या प्रेतयात्रेला संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS